घरात उंदरांनी हैदोस घातल्यानंतर त्याचा किती त्रास होतो हे अनेकांनी अनुभवलं असेल. कितीही उपाय केले तरी काही ठिकाणांवर उंदीर पुन्हा पुन्हा येतात. खासकरून पावसाळ्यात उंदरांनी चांगलाच हैदोस घातलेला बघायला मिळतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला उंदरं पळवून लावण्याच्या काही वेगळ्या टिप्स सांगणार आहोत.
१) पुदीना
घरात ज्या जागेतून उंदीर प्रवेश करतो त्या जागेवर पुदीन्यांचं तेल कापसाला लावून ठेवा. पुदीन्याच्या सुगंधामुळे उंदीर घरात येत नाहीत. उंदीर पळवण्यासाठी तुम्ही घरात पुदीन्याचं रोपही लावू शकता.
२) तुरटी
उंदरांनी जिथे आपलं बीळ तयार केलं आहे त्याबाहेर तुरटीचं पावडर टाकून ठेवा. याने ते दूर पळतील.
3) काळे मिरे
काळे मिरे पाण्यात मिश्रित करून उंदरांच्या बीळावर ते पाणी टाका. याच्या वासाने ते दूर पळतील.
४) कांदा
कांद्याचा दर्प फार डार्क असतो. उंदीरांना हा वास सहन होत नाहीय. त्यामुळे कांद्याचे काही तुकडे त्यांच्या बीळावर टाका.
५) केस
आपले केसही उंदीरांसाठी घातक ठरू शकतात. केस फेकण्याऐवजी ते उंदरांच्या बीळाजवळ ठेवा. उंदीर केस खाऊन मरतात.