Cockroaches removal tips: किचनमध्ये स्वच्छता सगळेच करतात पण कुठे ना कुठे काही राहून जातं. ज्यामुळे किचनमध्ये आणि घरात झुरळं होतात. हे झुरळं इतके वाढतात की, घरात सगळीकडे फिरत असतात. ज्यांमुळे आरोग्याचं नुकसान होतं. घरातील झुरळं दूर करण्यासाठी जास्तीत जास्त लोक बाजारातून केमिकल्स किंवा औषधं आणतात. पण याने फार काही फायदा होत नाही. अशात तुम्ही काही घरगुती उपाय करून हे झुरळं बाहेर काढू शकता. त्यासाठी काय करावं हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
किचनमधून झुरळ बाहेर काढण्याचे उपाय
शेफ पंकज भदोरिया यांनी त्यांच्या इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. यांचा वापर करून तुम्ही झूरळ घरातून बाहेर काढू शकता.
- शेप पंकज यांच्यानुसार थोडं बोरिक पावडर घ्या आणि त्यात थोडी बारीक केलेली मिरची टाका. हे पावडर अशा ठिकाणी पसरवा जिथे झुरळ येतात. काही दिवस हा उपाय केल्यावर झुरळ घरातून गायब होतील.
- जर बोरीक पावडर नसेल तर घरात नक्कीच बेकिंग पावडर असेल. बेकिंग पावडरमध्ये थोडं तिखट टाका आणि हे मिश्रण झुरळ येतात त्या ठिकाणी टाका. झुरळं घरातून बाहेर जातील.
- तसेच सगळ्यांच्या घरात लवंग असेतच. याचाही वापर तुम्ही करू शकता. लवंगाचे काही तुकडे घरातील कानाकोपऱ्यात टाकून ठेवा. याच्या गंधाने झुरळ येणार नाहीत.
- तेजपत्ताच्या सुगंधाने झुरळं बाहेर पळतात. घरातील ज्या कोपऱ्यात झुरळ अधिक प्रमाणात असतात त्याठिकाणी तेजपत्त्याची काही पाने बारीक करुन ठेवा. तेजपत्ते बारीक केल्यावर तुमच्या हाताला तेल लागल्याचे दिसेल. याच तेलाचा सुगंध झुरळांना पळवून लावतो. ही पाने काही दिवसांनी बदलत रहावी.
- एका वाटीमध्ये समान प्रमाणात बेकिंग पावडर आणि साखर मिश्रित करा. साखरेचा गोडव्याकडे झुरळं आकर्षित होतात आणि बेकिंग सोड्यामुळे ते मारले जातात.
- केरोसिनचा वापर करुनही घरातील झुरळं पळवून लावता येतात. पण याच्या वासाने तुम्हालाही त्रास होऊ शकतो.