अंडी व भुईमूगामुळे बालकांना अॅलर्जीचा धोका कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2016 3:14 PM
चार महिन्याच्या बाळाला अंडी व भुईमूग खाऊ घातले तर त्यांना अॅलजी होण्याचा धोका हा कमी असतो.
नवजात बाळाला सहा महिन्यापर्यंत डॉक्टर केवळ आईचे दूध पाजण्याचा सल्ला देतात. परंतु, अलीकडे एका नव्या संशोधनात समोर आले की, चार महिन्याच्या बाळाला अंडी व भुईमूग खाऊ घातले तर त्यांना अॅलजी होण्याचा धोका हा कमी असतो. अंडी व भुईमूग दुधाबरोबर पेस्ट करुन बाळाला खाऊ घालता येते.लंडनमधील इम्पीरियल कॉलेजमध्ये या संशोधनानुसार ज्या बाळांना चार ते सहा महिन्याच्या दरम्यान अंडी खाऊ घातली. त्यांना ४६ टक्के अॅलर्जी होण्याचा धोका अन्य बाळांच्या तुलनेत कमी असल्याचे समोर आले. तसेच चार ते अकरा महिन्याच्या दरम्यान ज्यांना भुईमूग दिले, त्यांना ७१ टक्के अॅलर्जी होण्याचा धोका इतरांपेक्षा कमी असल्याचे समोर आले.संशोधक रॉबर्ट बॉयल म्हणाले की, लहान बाळांचे अंडी व भुईमूग हे पहिले जेवण पाहीजे. परंतु, डॉक्टर तसा सल्ला देत नाहीत. बाळांना देण्यात येत असलेले जेवणाचे डायरेक्शन बदलण्याची गरज आहे. बॉयल व त्यांच्या सहकाºयांनी याकरिता मागील ७० वर्षात प्रकाशित १४६ संशोधनाच्या आकड्यांचा अभ्यास केला.