कोरोना व्हायरसपासून बचावासाठी फेस मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग पाळलं जाणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत कोरोनाची लस आणि औषध तयार होत नाही तोपर्यंत कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी स्वच्छता ठेवून नियमांचे पालन करायला हवं. कोरोना व्हायरसशी निगडीत अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात दिसून आलं की, एका खास फ्रॅब्रिकपासून तयार झालेला मास्क फक्त इन्फेक्शनपासून वाचवत नाही तर कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतो. इंडिआना युनिव्हरसिटीतील शास्त्रज्ञांनी कपड्यांपासून फेसमास्क तयार केला आहे.
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार तज्ज्ञांनी दावा केला आहे की, हा मास्क वापरल्यास इन्फेक्शनपासून बचाव करता येऊ शकतो. त्याशिवाय मास्क बॅक्टेरियांना मारण्यासाठीसुद्धा प्रभावी ठरतो. या फॅब्रिकला एलेक्ट्रोसुटिकल फॅब्रिक असं म्हणतात. त्यामुळे बॅक्टेरिअल संक्रमणापासून वाचता येऊ शकतं. म्हणूनच या फॅब्रिकला एफडीएकडून मान्यता देण्यात आली आहे.
या फॅब्रिकमध्ये असलेले माइक्रोसेल बॅटरीज इलेक्ट्रिकल फिल्ड तयार करतात. त्यामुळे व्हायरस निष्क्रिय होतो. हा शोध समोर आल्यानंतर वी डॉट डॉक्स(V.Dox) टेक्नोलॉजीने या फॅब्रिकपासून मास्क तयार करण्यासाठी सुरूवात केली आहे. हे फॅब्रिक काही वर्षापूर्वी ओहिओ स्टेट युनिव्हरसिटीमध्ये तयार करण्यात आलं होतं. इंडिआना युनिव्हरसिटी ऑफ मेडिसिनमधील तज्ज्ञ चंदन सेन यांनी हे फॅब्रिक तयार केलं होतं.
बॅक्टेरिया बायोफिल्म तयार करण्यासाठी आणि एकमेकांशी जोडण्यासाठी इलेक्ट्रिकल सिग्नलचा वापर केला जातो. बायोफिल्म हे पातळ आवरण असून एंटीबायोटिक्सविरुद्ध शील्ड तयार करण्यासाठी वापरले जाते. सिल्वर आणि झिंकचा वापर करून एलेक्ट्रोसुटिकल फॅब्रिक तयार केलं आहे. जे मायक्रोसेल बॅक्टेरियांना संपवतात आणि कमी क्षमतेचे इलेक्ट्रिकल फिल्ड तयार करतात. इलेक्ट्रिकल फिल्ड बॅक्टेरियांना संपवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
वाढतं कोरोनाचं संक्रमण लक्षात घेता चंदन सेन यांनी सांगितले की, या घटकांपासून तयर झालेला मास्क इन्फेक्शनची पसरण्याची क्षमता रोखू शकतो. या कापडाच्या संपर्कात आल्यानंतर व्हायरसची क्षमता कमी होऊ शकते. सध्या या कापडापासून दोन प्रकारचे मास्क तयार केले जात आहेत. त्यातील एक वॉशेबल मास्क आहे. ज्यामध्ये फॅब्रिक्सचं एक आवरण काढता येऊ शकतं. दुसरं डिस्पोजेबल म्हणजेच एकदाच वापरात येईल असे मास्क तयार केले जात आहेत. आत्तापर्यंत कंपनीद्वारे मास्कची किंमत निश्चित करण्यात आलेली नाही.
कोणत्याही कारणाने दवाखान्यात जावं लागलं; तर कोरोनाला बळी पडण्याआधी वापरा 'या' टीप्स
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा; समोर आली ही ५ कारणं