- मयूर पठाडेआपला आहार आणि आरोग्य यांचा खूपच जवळचा संबंध आहे. आपल्या सर्वांनाच ते खूच चांगलं माहीतही आहे, पण आहाराची किती काळजी आपण घेतो. आवश्यक तो आहार आपल्या शरीराला मिळतो का? मुळात काय खायचं, काय खायचं नाही आणि कोणत्या आहारातून काय घटक आपल्याला मिळतात, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.. यातलं काय आणि किती आपल्याला माहीत असतं?जे अन्न आपण खातो, त्यातून आपल्याला एनर्जी मिळते, आपल्या शरीराच्या चलनवलनासाठी या एनर्जीची आपल्याला फार आवश्यक असते. यात प्रोटिन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सची आपल्याला सर्वाधिक आवश्यक असते. मात्र त्याचबरोबर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स या गोष्टींचीही खूपच गरज असते.या गोष्टी कशा मिळवायच्या?कोणत्या अन्नात, फळांत काय घटक आहेत हे आपल्याला माहीतच हवं.अनेक अन्नघटक असे असतात, ज्यात न्युट्रिशस, आपल्या शरीराला फायदेशीर असे घटक फारच कमी असतात किंवा जवळपास नसतातच.काही अन्नपदार्थांत मिनरल्स, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स.. यासारखे घटक अजिबात नसतात. काहींमध्ये केवळ कॅलरीज असतात.केक्स, कॅण्डी, कुकीज, वेगवेगळे ज्युसेस या साºया गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेटसचं प्रमाण खूपच जास्त असतं. त्यामुळे असे पदार्थ शक्यतो टाळलेलेच बरे.जे पदार्थ खूप आॅइली आहेत, उदाहरणार्थ चिप्स, फ्राईज.. आपल्या हृदयासाठी ते घातक आहेत. त्यामुळे या पदार्थांपासूनही दूर राहायला हवं.अल्कोहोल, कॅफिनसारख्या गोष्टींना लांबूनच रामराम करायला हवा.ज्या पदार्थांतून जास्तीत जास्ती आरोग्यदायी घटक आपल्याला मिळतीत त्यांचा आहारात समावेश हवा.आहारासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी१- आपल्या आहारात रोज तीन जेवणं आणि चार वेळा नाश्ता हवा. त्याचं प्रमाण कमी असलं तरी चालेल, पण चार तासापेक्षा जास्त उपाशी राहू नये.२- मिनरल्स, व्हिॅटॅमिनयुक्त समतोल आहार घ्यावा.३- व्हाईट राईसऐवजी ब्राऊन राईस केव्हाही चांगला.४- व्हाईट ब्रेडऐवजी होलग्रेन ब्रेडचा वापर करावा.५- ताज्या आणि चमकदार फळं, भाज्यांचा आहारात समावेश हवा.६- प्रोसेस्ड फूडचा वापर शक्यतो नकोच.
दिवसभर एनर्जी, उत्साह हवा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 1:26 PM
आहारातल्या या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष..
ठळक मुद्देआपण जे काही खातो, तसेच आपण बनतो.समतोल आहार अत्यावश्यक.अनेक अन्नघटक असे आहेत, ज्यांचा आपल्या शरीराला काहीच उपयोग नाही, ते टाळावेत.रोज तीन वेळा जेवण आणि चार वेळा नाश्ता आवश्यक.