संशोधकांनी, झोपेमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये हृदय विकाराचा झटका येण्याच्या शक्यतेवर नजर ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबधित एक नवीन प्रणाली विकसित केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, ही प्रणाली झोपलेल्या व्यक्तीला स्पर्श न करता त्यांच्यावर नजर ठेवण्याचं काम करते.
अमेरिकेतील वॉशिंग्टन विश्वविद्यालयच्या संशोधकांनी सांगितल्यानुसार, ज्या व्यक्तींना हृदय विकाराचा झटका येतो, त्या व्यक्ती अचानक बेशुद्ध होतात. त्यानंतर त्या व्यक्ती बेशुद्ध पडतात किंवा त्या अस्वस्थ होतात.
गूगल होम आणि अॅमेझॉन एलेक्सा यांसारख्या स्मार्ट स्पीकर्स किंवा स्मार्टफोनमध्ये एक नवीन तंत्रज्ञान विकसित केल्याने उपकरणाला जोरात श्वास घेण्याचा आवाज ओळखला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यक्तीला होत असलेल्या त्रासाची माहिती जवळच्या एखाद्या व्यक्तीला मिळण्यास मदत होते.
तत्काळ कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) या तंत्रज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता वाढते. परंतु, यासाठी या व्यक्तीच्या आजूबाजूला एखादी व्यक्ती तरी असणं गरजेचं आहे.
वॉशिंगटन विश्वविद्यालयातील असोशिएट प्रोफेसर गोलाकोटा यांनी सांगितले की, सध्या अनेक लोकांच्या घरामध्ये स्मार्ट स्पीकर असतात आणि या उपकरणांमध्ये एक उत्तम क्षमता असते, ज्याचा फायदा आपण घेऊ शकतो.'
गोलाकोटा यांनी सांगितले की, आम्ही एका संपर्करहित प्रणालीची कल्पना केली असून ही प्रणाली श्वास घेण्यासाठी होत असलेल्या त्रासाच्या कोणत्याही घटनेवर लक्ष ठेवते. यामुळे आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सावध करून सीपीआर देण्यासाठी सावध करते. एवढचं नाही तर, आजूबाजूला कोणी नसेल, तर हे उपकरण त्यामध्ये सेट केलेल्या आपातकालीन नंबर्सवर फोन करून व्यक्तीला होत असलेल्या त्रासाची माहिती देते.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.