तुम्ही कारलं खाल्लं नाही, औषधांच्या गोळ्या घेतल्या नाहीत किंवा एखादा कडू पदार्थ खाल्ला नाही तरी तुमच्या जिभेला सर्वकाही कडू लागतंय. तर त्यामागे नेमकी काय कारणं आहेत ते पाहुयात.तोंडाची स्वच्छता न राखणंतोंड योग्यप्रकारे स्वच्छ न ठेवल्यानं कडू चव लागते. तोंड स्वच्छ न ठेवल्यानं तुमच्या जिभेवर मृत पेशी, बॅक्टेरिया राहतात, त्यामुळे जिभेच्या चवीवर फरक पडतो. त्यामुळे फक्त दात घासणं नव्हे, तर जीभही स्वच्छ करणं गरजेचं आहे.
अॅसिडीटीतुम्हाला अॅसिडीटीची समस्या असेल त्यावेळी तुमच्या जिभेला कडू चव येईल. पोटातील अॅसिड किंवा पोटातील इतर घटक अन्ननलिकेत पुन्हा येतात, तेव्हा कडू चव लागते.
डिहायड्रेशनडिहायड्रेशनमुळेही काही वेळा कडू चव लागू शकते. तहान लागल्यानं आणि तोंड सुकल्यानं अशी चव लागते. ही समस्या टाळण्यासाठी दिवसभर पुरेसं पाणी प्या. तज्ज्ञांच्या मते, डिहायड्रेशन होऊ नये यासाठी किमान 8 ग्लास पाणी प्यावं.
श्वसनमार्गात इन्फेक्शनखोकला किंवा तापामुळे पदार्थांची चव लागत नाही. काहीवेळा तोंडाला कडू चव येते. याबाबत काळजी करण्याचं कारण नाही. श्वसनमार्गातील इन्फेक्शन दूर झाल्यानंतर तोंडाला चवही येते. मात्र खोकला किंवा ताप असताना तोंडाची स्वच्छता राखणं गरजेचं आहे.
दातांच्या समस्यातोंडाची स्वच्छता न राखल्यानं दातांच्या समस्या निर्माण होतात. दातांच्या समस्या आणि हिरड्यांच्या आजाराची अनेक लक्षणं दिसतात, त्यापैकीच एक आहे तोंडातील कडू चव. त्यामुळे तोंडाला कडू चव लागत असेल तर दातांच्या डॉक्टरांना दाखवा, त्यामुळे दात आणि हिरड्यांच्या आजारांचं निदान होईल.
तोंडानं श्वास घेणेसर्दीनं नाक बंद झाल्यास अनेक जण तोंडावाटे श्वास घेतात. त्यामुळे तोंड कोरडं पडतं परिणामी तोंडाला कडवट चव येते. त्यामुळे पुरेसा आराम करा.
तोंडाला कडवट चव येण्याची ही काही कारणं आहेत. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा जिभेतील मज्जातंतूना हानी पोहोचल्यानं, लाळग्रंथींना संसर्ग झाल्यानं, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे किंवा इतर कारणामुळेही कडवटपणा येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला कडवट चव लागत असेल तर डॉक्टरांना दाखवा आणि त्यांचा सल्ला घ्या.
तोंडाची कडवट चव घालवण्याचे उपाय
- नियमित दातांची काळजी घ्या, जसे की ब्रश करणे, फ्लोसिंग आणि अँटीबैक्टीरियल माउथवॉश वापरणे.
- दातांच्या समस्या असल्यास त्वरित डॉक्टरकडे जा.
- दिवसभर पाणी पिणे.
- दातांच्या साफसफाईसोबतच जिभेची स्वच्छता राखा.
- अति गोड, मसालेदार पदार्थ कमी खाणे. व्यसनांपासून मुक्त राहणे
- संत्र, लिंबू यासारखे आंबटपदार्थ खा जिभेवरील कडवटपणा दूर होईल