कामाची धावपळ आणि बदलणारी जीवनशैली यांमुळे तुम्हाला सकाळी एक्सरसाइजसाठी वेळ काढणं शक्य होत नाही का? मग चिंता नका करू. ऑफिसवरून घरी आल्यानंतर संध्याकाळी एक्सरसाइज करण्यास सुरुवात करा. खरं तर आपल्यापैकी अनेकजणांचा असा समज आहे की, एक्सरसाइज, वर्कआउट आणि फिजिकल अॅक्टिव्हिटीचा फायदा फक्त सकाळच्यावेळीच होतो. पण याच समजाच्या अगदी विरूद्ध बाब संशोधकांनी संशोधनातून शोधली आहे. संशोधकांनी केलेल्या संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, संध्याकाळी केलेली एक्सरसाइजही सकाळच्या एक्सरसाइज एवढीच फायदेशीर असते.
वेगवेगळ्या वेळी होतो वेगवेगळा परिणाम
सेल मेटाबॉलिज्म जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, एक्सरसाइजचा शरीरावर होणारा परिणाम हा दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेच्या आधारावर वेगवेगळा असू शकतो. डेनमार्कमध्ये कोपेनहेगन युनिवर्सिटीमधील असोशिएट प्रोफेसर जोनास थ्यू ट्रीबक यांनी सांगितले की, 'सकाळी आणि संध्याकाळी करण्यात आलेल्या एक्सरसाइजचा परिणामांमध्ये एक महत्त्वपूर्ण अंतर दिसून येते.
शरीरातील ऊर्जा वाढवतं
ट्रीबक यांनी सांगितल्यानुसार, 'सकाळी करण्यात आलेली एक्सरसाइज स्नायूंच्या पेशींमध्ये जीन प्रोग्रा सुरू करते. ज्यामुळे ते अधिक प्रभावी होण्यासोबत फॅट आणि शुगरची मेटाबॉलिज्मच्या प्रक्रियेमध्येही सक्षम असतात. दुसरीकडे संध्याकाळी एक्सरसाइज केल्याने उंदरांच्या स्नायूंमध्ये मेटाबॉलिज्म प्रोसेस वाढत असल्याचे दिसून आले. परंतु तेच सकाळी व्यायाम केल्याने थोड्या वेळासाठीच शरीरात ऊर्जा तयार होण्याचे प्रमाण वाढते.
शरीराच्या बॉडी क्लॉकला नियंत्रित करतं संशोधकांनी स्नायूंच्या पेशींमध्ये होणाऱ्या अनेक परिणामांचा सखोल अभ्यास केला. ज्यामध्ये ट्रांसक्रिप्शनल प्रतिक्रिया आणि मेटाबॉलिज्मवर होणाऱ्या परिणामांचाही समावेश होता. या परिणामांनुसार, सकाळी व्यायाम केल्यानंतर दोन्ही क्षेत्रांमधील प्रतिक्रिया अधिक मजबुत होतात आणि एका केंद्रिय तंत्राद्वारे नियंत्रित केल्या जातात. ज्यामध्ये प्रोटीन एचआयएफ 1-अल्फाचा समावेश करण्यात आला होता. जे थेट शरीराचं बॉडी क्लॉक नियंत्रित करण्याचं काम करतं.
टिप : वरील सर्व गोष्टी एका संशोधनातून सिद्ध करण्यात आल्या असून या फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.