High Blood Sugar Symptoms : बदलती लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल लोकांना लगेच वेगवेगळे गंभीर आजार होत आहेत. या आजारांची वेगवेगळी लक्षणं शरीर वेळोवेळी देत असतं. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात. असं करणं करणं त्यांना महागात पडू शकतं. असाच एक आजार म्हणजे हाय ब्लड शुगर म्हणजेच डायबिटीस. जेव्हा ब्लड शुगर हाय होते तेव्हा या स्थितीला हायपरग्लायकेमिया (Hyperglycemia) म्हणतात. ही स्थिती आरोग्यासाठी फार घातक असते. याची पुढची स्टेज हार्ट अटॅक असते. ज्यात व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.
एक्सपर्ट सांगतात की, जेव्हा शरीरात ब्लड शुगर हाय होऊ लागते तेव्हा शरीर काही खास संकेत देऊ लागतं. अशा स्थितीत व्यक्तीचा घसा पुन्हा पुन्हा कोरडा पडू लागतो. त्यासोबतच पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याचीही इच्छा होते. स्कीन इन्फेक्शन, धुसर दिसणे, ब्लॅडर इन्फेक्शन होणे, अचानक वजन कमी होणे, हे सगळे या गोष्टीचे संकेत आहेत की, तुमच्या ब्लडमध्ये शुगर लेव्हल हाय होत आहे. जी तुम्हाला कंट्रोल करण्याची गरज आहे.
डायबिटीस वाढण्याची कारणं
मेडिकल एक्सपर्ट सांगतात की, ब्लड शुगर हाय होणं कुणासाठीही जीवघेणं ठरू शकतं. त्यामुळे त्यावर कंट्रोल करणंच चांगलं ठरतं. शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढण्याच्या कारणांमध्ये डिहाइड्रेशन, शारीरिक व्यायामाची कमतरता, जास्त खाणं, मानसिक तणाव, डायबिटीसची औषधं घ्यायला विसरणं किंवा एखा जुना आजार यांचा समावेश आहे.
ब्लड शुगर कशी कंट्रोल कराल?
जर तुम्हाला शरीरात ब्लड शुगर हाय होताना दिसत असेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा. नेहमी सोबत डायबिटीस कंट्रोल करणारी औषधं ठेवा. जर रात्री तुमची शुगर वाढली आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कुणालातरी सोबत घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये जावे.
आणखी एक कारण...
एक्सपर्ट सांगतात की, जेव्हा शरीरात पुरेशा प्रमाणात लालरक्त पेशी निर्माण होत नाहीत, तेव्हा एनीमियाची समस्या होऊ शकते. पुन्हा पुन्हा लघवी लागणे आणि घसा कोरडा पडणे याचं एक लक्षण असू शकतं. कमजोरी, अधिक थकवा जाणवणे, चक्कर येणे, हात आणि पायांना थंडी वाजणे, डोकेदुखी ही सुद्धा एनीमियाची लक्षणं आहेत.