शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

Excessive Salt Intake: भारतीयांसोबत मिठाचे जीवघेणे कारस्थान! WHO चा मोठा इशारा, या एका गोष्टीमुळे वाचेल 70 लाख लोकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:11 AM

या अहवालात WHO ने इशारा देत, मीठ कशामुळे जीवघेणे ठरत आहे, हे सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका ताजा अहवालामुळे आपल्या जेवणाची चव कमी होऊ शकते. WHO च्या या अहवालानुसार, जगभरात जवळपास 18 लाख 90 हजार लोक मिठाच्या (Salt) अधिक सेवनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. या अहवालात WHO ने इशारा देत, मीठ कशामुळे जीवघेणे ठरत आहे, हे सांगितले आहे. या अहवालानुसार, जगातील केवळ 3 टक्के लोकच मीठाचे योग्य प्रमाणात सेवन करत आहेत.

गरजेपेक्षा अधिक मिठाचे सेवन जीवघेणे -या अहवालानुसार, आवश्यकतेपेक्षा अधिक मिठाचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे कारण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, सध्या जगातील प्रति व्यक्ती मिठाचा वापर 10.8 ग्रॅम एवढा आहे. तर WHO ने प्रति व्यक्ती मिठाच्या वापराची कमाल मर्यादा 5 ग्रॅम एवढी निश्चित केली आहे. मात्र, आणखी एक पाऊल पुढे टाकत, 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनी हे प्रमाण 5 ग्रॅमपेक्षाही कमी करायला हवे आणि लहान मुलांच्या बाबतीत हे प्रमाण आणखी कमी असावे, शी शिफारस WHO ने केली आहे. हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी केले जाऊ शकतात -WHO नुसार, जर मिठाचे प्रमाण कमी करता आले तर जगभरात दर वर्षी हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण बरेच कमी केले जाऊ शकेल. महत्वाचे म्हणजे, मिठाचा वापर कमी केलास, 2025 पर्यंत 22 लाख लोकांचा जीव वाचू शकतो आणि 2030 पर्यंत जवळपास 70 लाख लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. जे सध्या अधिक मिठाच्या सेवनामुळे हृदयरोगी बनत चालले आहेत, असा WHO चा अंदाज आहे. अर्थात सध्या होत असलेल्या मृत्यूचे प्रमाण 3 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते.

भारताला मिळाले असे रेटिंग - या अहवालात मिठाचे प्रमाण कमी करण्यासंदर्भातील पॉलिसीच्या आधारे स्कोर देण्यात आला आहे. हा स्कोर 1 ते 4 दरम्यान आहे. 1 सबसे म्हणजे सर्वात कमी आणि 4 म्हणजे सर्वाधिक स्कोर आहे. 1 मध्ये असे देश आहे, ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात वचनबद्धता दर्शवली आहे. 2 स्कोर वर असे देश आहेत ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात पावले तर उचलली पण ती ऐच्छिक आहेत, बंधनकारक नाहीत. याच बरोबर ज्या देशात पॅकेट बंद पदार्थांवर सोडियमचे प्रमाण सांगितले आहे. भारताचा स्कोर दोन आहे. 3 स्कोर अशा देशांचा आहे, ज्या देशांनी आवश्यक नियम बनवून अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच 4 स्कोर अशा देशांचा आहे, ज्यांनी मिठाचे प्रमाण रेग्युलेट करण्यासाठी पॅकेज्ड फूडमध्ये सोडियमचे प्रमाण दर्शवले, असे किमान दोन अनिवार्य पॉलिसी नियम तयार केले. 

WHO चा इशारा - WHO नुसार, भारतात पाकीट बंद अन्ना वर मिठाचे प्रमाण लिहिलेले असते. मात्र, पाकिटाच्या समोरील बाजूला अधिक  मिठाचा इशारा देण्याची प्रॅक्टीस अद्याप सुरू झालेली नाही. मग, पॅकेज्ड फूड मगते चिप्स असोत अथवा कुठलाही पदार्थ, त्यात प्रमाणापेक्षा अधिक मिठ टाकले जाते. मिठ एक एडिक्टिव अर्थात सवय लागणारा पदार्थ आहे. तसेच जे अन्न अधिक चटपटीत असते, त्याची सवय फार लवकर लागते. याच धारणेने बाजारात अधिक चटपटीत मसाल्यांचे चिप्स, नमकीन आणि बिस्किटांची विक्री केली जाते.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारतfoodअन्नHealthआरोग्यHeart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटका