तुम्ही अशा लोकांपैकी आहात का ज्यांना जास्त घाम येतो? केवळ ५ मिनिटांच्या ट्रेडमिल वर्कआउटनंतर तुम्ही घामाने चिंब भिजता का? कुणाला हॅंडशेक करण्याआधी तुमच्या हाताला घाम (Excessive Sweating) येतो? जर या सर्व प्रश्नांची उत्तरे हो असतील तर ही एक सामान्य समस्या समजून याकडे दुर्लक्ष करू नका. कारण फार जास्त घाम येणे एखाद्या गंभीर आजाराचा संकेतही असू शकतो. जास्त घाम येण्याच्या समस्येला मेडिकल भाषेत हायपरहायड्रोसिस (Hyperhidrosis) असं म्हटलं जातं.
कारण नसताना येऊ लागतो घाम
अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटॉलजीशी संबंधित डर्मेटॉलॉजिस्ट बेंजामिन बारान्किन सांगतात की, 'जास्तीत जास्त वेळी हा फरक करणं अवघड असतं की, त्यांना सामान्यपणे घाम येतोय की एखाद्या कारणाने वा आजारामुळे येतोय. घाम येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही गरम वातावरणात असता, फिजिकल अॅक्टिविट करता, स्ट्रेसमध्ये असता किंवा भीतीचा सामना करता तेव्हा तुम्हाला घाम सामान्य बाब आहे. पण हायपरहायड्रोसिस म्हणजे अधिक जास्त घाम येणे ही समस्या लोकांना ते थंड वातवरणात असताना, कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी न करता, किंवा कोणत्याही कारणाशिवाय घाम येतो. कोणत्याही कारणाशिवाय त्यांना इतरांपेक्षा जास्त घाम येतो'. (हे पण वाचा : सर्वाधिक महिला होताहेत कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सच्या शिकार; सीडीसीचा संशोधनातून खुलासा)
अमेरिकी हेल्थ वेसबाइट webmd.com नुसार, अनेक आजार किंवा मेडिकल कंडिशनमुळे जास्त घाम येण्याची समस्या होऊ शकते. जसे की,
- मेनोपॉज
- थायरॉइड - जेव्हा एखाद्या व्यक्तीला हायपोथायरॉयडिज्मची समस्या होते. त्यांचं शरीर उष्णतेप्रति अधिक संवेदनशील होतं. त्यामुळे त्यांना अधिक घाम येतो.
- डायबिटीस - जे लोक इन्सुलिन किंवा डायबिटीसचं औषध घेतात त्यांच्या शरीरात अनेकदा ब्लड ग्लूकोजचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळी अधिक घाम येतो. ग्लूकोजची लेव्हल सामान्य झाली की, घाम येत नाही.
- हार्ट फेल्युअर - अचानक खूप घाम येणं हा हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर किंवा हार्टसंबंधी इतर आजाराचा संकेत असू शकतो. हार्ट अटॅक आल्यावर केवळ घाम येणार नाही तर छातीतही दुखेल. इतरही काही लक्षणे दिसतील.
- दारूची प्यायची सवय - अल्कोहोल शरीराचं नर्वस सिस्टीम, सर्कुलर सिस्टीमसहीत इतरही काही भागांना प्रभावित करते. फार जास्त दारू प्यायल्याने हार्ट रेट वाढतो आणि यामुळेही अधिक घाम येण्याची समस्या होते.
- रूमेटाइड आर्थरायटिस - हा एक ऑटोइम्यून आजार आहे. ज्यात हाडांच्या जॉइंटमध्ये इन्फ्लेमेशन होऊ लागतं. या आजाराने पीडित लोकांना रात्रीच्या वेळी अधिक घाम येतो.