शरीरात वाढणारी चरबी कंट्रोल करण्यासाठी आपण कितीही प्रयत्न करता, तेवढा जास्त तुम्ही तणाव घेता. म्हणजे ही चरबी कशी कमी होणार यासाठी प्रयत्न करण्याऐवजी वाढत्या वजनाचं टेन्शन अधिक घेता. पण तुम्हाला जर सामान्य मेहनत घेऊन वेगाने वजन कमी करायचं असेल तर हे शक्य आहे. पण केवळ बसल्या जागेवर तुमचं वजन व्हावं अशी तुमची अपेक्षा असेल तर मग विषयच संपतो.
(Image Credit : womansday.com)
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, सकाळी काहीच न खाता व्यायाम केला तर वजन दुप्पट वेगाने कमी होतं. म्हणजे सकाळी उठून पाणी प्यायल्यावर आणि फ्रेश झाल्यावर जर एक्सरसाइज केली तर त्याचा प्रभाव शरीरावर दुपारी जिम जाणे किंवा सायंकाळी एक्सरसाइज करण्यापेक्षा अधिक असतो. जर तुम्ही सकाळच्या वेळी नाश्ता करून काही तास एक्सरसाइज करत असाल तेव्हाही वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरत नाही. त्याऐवजी काहीच न खाता एक्सरसाइजने वजन अधिक वेगाने कमी होतं.
(Image Credit : skinnyms.com)
हा रिसर्च काही दिवसांपूर्वी Journal of Clinical Endocrinology & Metabolism मध्ये प्रकाशित करण्यात आला. या रिसर्चमधून समोर आलं आहे की, सकाळी अनोशापोटी एक्सरसाइज केल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवता येतं आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते. ज्याने वाढत्या वजनावर आपोआप नियंत्रण येतं. तसेच यावेळी एक्सरसाइज केल्याने फॅट बर्नही दुप्पट वेगाने होतं.
या रिसर्चचे निष्कर्ष जाणून घेण्यासाठी लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त लोकांचे दोन गट तयार करण्यात आले. एका गटातील लोकांनी नाश्ता केल्यावर एक्सरसाइज करण्यास सांगण्यात आले तर दुसऱ्या गटातील लोकांना नाश्त्याआधी एक्सरसाइज करण्यास सांगण्यात आले. या शोधाचं मूल्यांकन केल्यावर असं दिसून आलं की, ज्या लोकांनी नाश्त्याआधी एक्सरसाइज केली, त्यांच्या शरीरातील चरबी घटण्याची प्रक्रिया दुप्पट वेगाने झाली.