हाय ब्लड प्रेशर सध्या लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना सतावणारी समस्या आहे. सततची धावपळ, कामाचा ताण आणि सतत जंक फूडचं सेवन यांमुळे सर्व वयोगटातील लोकांना त्रास होण्याची शक्यता असते. तसेच शरीराच्या अनेक समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो. याव्यतिरिक्त लठ्ठपणामुळेही तुम्हाला हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना कराव लागू शकतो. एवढचं नव्हे तर यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोकाही वाढतो. अनेक लोकांना हार्ट अटॅकही येतो. हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी थंडीमध्ये आपली विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. अन्यथा अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी सध्या बाजारामध्ये अनेक औषधं उपलब्ध आहेत. परंतु याऐवजी तुम्हाला काही व्यायामही मदत करतील. त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना डॉक्टरही हे व्यायाम करण्याचा सल्ला देत असून दररोज कमीत कमीत 45 मिनिटं व्यायम करण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो.
वॉक करणं
तुम्हालाही हाय ब्लड प्रेशरचा त्रास सहन करावा लागत असेल तर दररोज वॉक करण्याची सवय लावून घ्या. यामुळे फक्त ब्लड प्रेशरच कमी होत नाही तर शरीराचं अनेक प्रकारच्या गंभीर समस्यांपासून बचाव होतो. सकाळी आपल्या क्षमतेनुसार वेगाने चालत वॉक करा आणि दररोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटं न थांबता वॉक करा. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीजची समस्याही दूर होते.
सायकलिंग
सायकलिंग करणं सर्वात उत्तम कार्डियोवॅस्कुलर एक्सरसाइज मानली जाते. जेव्हा तुम्ही पॅडल मारत तुमच्या पायांना वरती आणि खालती करता त्यावेळी संपूर्ण शरीरामध्ये ब्लड फ्लो वाढतो. जो हृदयासाठी फायदेशीर ठरतो. हाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेन्शनच्या रूग्णांसाठी दररोज कमीतकमी 20 मिनिटं सायकलिंग करणं गरजेचं असतं.
स्विमिंग करणं
तुम्ही कोणत्याही वयामध्ये स्विमिंग शिकत असाल तर शिकल्यानंतर दररोज स्विमिंग करा. वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी स्विमिंग बेस्ट ऑप्शन आहे. स्विमिंग केल्यामुळे ब्लड फ्लो वाढतो आणि शरीराची रचना उत्तम होते. वयोवृद्ध लोकांनाही स्विमिंग करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे शरीर ऊर्जा तयार होण्यास मदत होते.
डांस
तुम्हाला माहीत आहे का? डांन्सिगही एक प्रकारची एरोबिक्स एक्सरसाइज आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. डांस केल्यामुळे स्ट्रेस फार कमी होतो. ज्यामुळे हायपरटेंशन आणि हाय ब्लड प्रेशर यांसारख्या लक्षणांमध्ये आराम मिळतो. वयोवृद्ध लोकांनाबी आपल्या क्षमतेनुसार डांस करणं गरजेचं असतं. ज्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं.
सोप्या एक्सरसाइझ
फिट राहण्यासाठी आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही सोप्या एक्सरसाइजही करू शकता. जसं की, दिवसातून एक ते दोन वेळा घराच्या पायऱ्या चढा. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि मांसपेशी मजबूत होतात.