अॅरोबिक्स, रनिंग, दोरीच्या उड्या, क्रॉसफिट अशा काही कार्डिओ एक्सरसाइज करून हृदयरोगांचा धोका 50 टक्के कमी करता येऊ शकतो. कारण या एक्सरसाइजमध्ये हृदय वेगाने पंप होत. ज्यामुळे हृदयाची धडधड अधिक वेगाने होते आणि शरीरात अधिक प्रमाणात ऑक्सिजन पोहोचू लागतं. यादरम्यान हार्टबीट रेट दीड पटीने वाढतो आणि कधी कधी तर हा आकडा 100 ते 130 प्रति मिनिटे इतकाही होतो. याला कार्डिओवॅस्कुलर कंडिशन असं म्हणतात.
अनेकांना रनिंग करताना धाप लागते किंवा लवकर थकवा जाणवतो. या कारणाने ते जास्त रनिंगही करू शकत नाहीत आणि ना कार्डिओ एक्सरसाइज करू शकत. ही समस्या अलिकडे तरूणांमध्येही अधिक बघायला मिळते. त्यामुळे या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्यांनी तुम्हाला रनिंग करताना धाप लागणार नाही किंवा श्वास भरून येणार नाही.
धाप लागण्याची कारणे...
धावताना श्वास भरून येण्याची समस्या होणे ही सामान्य बाब आहे. पण जेव्हा त्रास अधिक वाढतो तेव्हा ही समस्या गंभीर होऊ शकते. जर ही समस्या केवळ धावताना किंवा कार्डिओ एक्सरसाइज करताना होत असेल तर यामागे काही कारणे असू शकतात.
सर्वातआधी तर ही समस्या होण्याचं मुख्य कारण हा तुमचा लठ्ठपणा असू शकतो. जास्त वजन असणाऱ्यांना काही आजार असतात. तसेच त्यांना पायऱ्या चढण्यासही समस्या होते. याने त्यांना धाप लागते. दुसरं कारण म्हणजे अॅलर्जी असू शकतं. अनेकांना धूळ-मातीची अॅलर्जी असते. ज्यामुळे त्यांना धावताना लगेच श्वास भरून येण्याची समस्या होऊ शकते. तसेच धावताना थकवा किंवा श्वास भरून येण्याचं कारण स्ट्रेसही असू शकतं. त्यासोबतच हृदयापर्यंत जर योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नसेल तर तुम्हाला लवकर थकवा येतो.
काय कराल उपाय?
1) वार्मअप करा
रनिंग करण्याआधी नॉर्मलपणे चालावे. एकदम धावायला सुरूवात करू नका. काही लोक लगेच धावायला सुरूवात करतात. ज्याने त्यांचे हार्टबीट आणि ब्रीदिंग रेट लगेच वाढतात. याने त्यांचा श्वास भरून येतो. त्यामुळे धावण्याची सुरूवात नेहमीच नॉर्मल वार्मअपने आणि हळूहळू करावी.
2) तोंडाने श्वास घेऊ नका
जेव्हा तुम्ही नॉर्मल वॉक करतात तेव्हा शरीराला कमी ऑक्सिजनची गरज असते. पण जेव्हा तुम्ही रनिंग करता तेव्हा हार्ट वेगाने पंप होतो आणि त्यामुळे त्याला अधिक ऑक्सिजनची गरज असते. जास्तीत जास्त लोक रनिंग करताना श्वास घेण्याच्या नादात तोंडाने श्वास घेणे सुरू करतात. ज्याने लवकर थकवा येतो. अशावेळी नाकाने श्वास घ्यावा. कधीच तोंडाने श्वास घेऊ नये.
3) मोठा श्वास घ्यावा
लवकर लवकर कमी श्वास घेतल्याने तुम्हाला लवकर थकवा येतो. या कारणाने जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही ऑक्सिजन योग्य प्रकारे घेऊ शकता आणि कार्बन डायऑक्साइड योग्य प्रकारे बाहेर सोडू शकता. त्यामुळे श्वास घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान नेहमी हे लक्षात ठेवा की, मोठा आणि लांब श्वास घ्या.
4) रनिंगमध्ये वॉक ब्रेक
रनिंग करताना थकवा येऊ नये म्हणून हा फार चांगला उपाय आहे. यासाठी ५ मिनिटे धावा आणि नंतर १ मिनिटांचा वॉक करा. काही लोक जास्त वेळ धावतात आणि नंतर ब्रेक घेतात. जे चुकीचं आहे.