Good Sleep Tips : आजकाल कामाचं टेंशन, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये करावं लागणारं काम, घरातील चिंता अशा एक ना अनेक कारणांमुळे लोकांना रात्री चांगली झोप न येण्याचा समस्या भेडसावत आहे. अशात लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत आहेत. ही समस्या झाली की, एक्सपर्ट सामान्यपणे कॉफी, दारू, चहा, चीज अशा गोष्टी टाळण्याचा सल्ला देतात. पण झोप येत नसेल तर असं काय खायला हवं की, ज्यामुळे तुम्हाला रात्री चांगली आणि लवकर झोप लागेल. आता एक्सपर्टने सल्ला दिला आहे की, झोपण्याआधी 'हे' खास फळ खाल्लं तर तुम्हाला चांगली झोप येईल.
नॅशनल इंस्टीट्यूट फॉर हेल्थ अॅन्ड केअर एक्सिलेंस यांना असं आढळलं की, झोपेची समस्या आजकाल गंभीर बनत चालली आहे. झोप केवळ मेंदुसाठीच नाही तर आरोग्यासाठी फार जास्त महत्वाची आहे. यामुळे आपण दिवसभर फ्रेश राहतो आणि आपली रोजची कामे योग्य पद्धतीने होतात. जर तुम्ही रात्री साधारण 7 तास झोप घेत नसाल तर यामुळे तुम्हाला अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.
एक्सपर्ट्सनी दावा केला आहे की, झोप येण्यासाठी असं जेवण केलं पाहिजे ज्यात ट्रायप्टोफॅन असेल. रॉयल कॉलेज ऑफ ऑक्यूपेशनल थेरपिस्टच्या एक्सपर्टनी सांगितलं की, झोपण्याआधी किमान एक केळ खाल्लं तर तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल. कारण यात ट्रायप्टोफॅन असतं.
ट्रायप्टोफॅन असं अमीनो अॅसिड आहे जे शरीरात सेराटोनिन आणि मेलाटोनिन नावाची हार्मोनची निर्मिती करतं. ज्यामुळे सहजपणे चांगली झोप लागते. पण एक्पर्ट्स हेही म्हणाले की, याशिवाय आणखीही काही अशा पद्धती आहेत ज्यामुळे लवकर झोप येऊ शकते. यात झोपण्याआधी टेक्नॉलॉजीचा म्हणजे मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टीव्ही न बघणे यांचा मुख्य समावेश आहे.
तसेच द स्लीप चॅरिटीनुसार, बदाम असा आहार आहे ज्यामुळे झोप लवकर आणि चांगली येण्यास मदत मिळते. कारण बदामात मॅग्नेशिअम असतं ज्यामुळे मांसपेशींना आराम मिळतो आणि झोप येण्यास मदत मिळते. यातून प्रोटीनही मिळतं जे झोपेवेळी रक्तात शुगरची लेव्हल स्थिर ठेवण्यास मदत करतं.
एक्सपर्ट्स सांगतात की, असं नाही की, केळी आणि बदाम खाल्ल्याने झोप येईलच. हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. यात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही तणावात असू नये किंवा तणाव कमी करण्यासाठी आधी काही उपाय करावे.