Water bottle cleaning tips : आजकाल जास्तीत जास्त लोक पाणी पिण्याच्यासाठी वेगवेगळ्या बॉटल्सचा वापर करतात. रोज घरातून किंवा ऑफिसमधून यात पाणी भरतात आणि पितात. पण बॉटलमधून पाणी पिताना तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण यात अनेक नुकसानकारक बॅक्टेरिया जमा होतात. जे तुम्हाला आजारी करू शकतात. अशात तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, पाण्याची बॉटल किती दिवसांनी धुवावी आणि कशी धुवावी. यासाठी डॉक्टर प्रियंका त्रिवेदी यांनी इन्स्टावर काही टिप्स शेअर केल्या आहेत.
किती दिवसांनी धुवावी पाण्याची बॉटल?
डॉक्टर प्रियंका यांनी सांगितलं की, पाण्याची बॉटल तशी तर रोज धुवायला हवी, पण आठवड्यातून दोन दिवस गरम पाण्याने धुवावी. जर असं केलं नाही तर तुम्ही अनेक आजारांचे शिकार होऊ शकता. जसे की, ताप, पोटदुखी, केसगळती आणि त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात. त्यामुळे निरोगी रहायचं असेल तर रोज वापरली जाणारी बॉटल स्वच्छ करावी.
बॉटल स्वच्छ करण्याच्या दोन पद्धती
पहिली पद्धत
बॉटल स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि साबण घ्या. बॉटलमध्ये गरम पाणी भरा आणि त्यात काही थेंब डिश वॉश टाका. नंतर बॉटल चांगल्या पद्धतीने हलवा. नंतर बॉटल ब्रशच्या मदतीने आतून स्वच्छ करा. नंतर तुमही व्हिनेगरच्या पाण्याचे बॉटल धुवून घेऊ शकता.
दुसरी पद्धत
यासाठी तुम्हाला व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा हवा. बॉटलमध्ये 1 ते 2 चमचे बेकिंग सोडा टाका, नंतर त्यत 1 कप व्हाईट व्हिनेगर टाका. आता बॉटल चांगली हलवा. हे मिश्रण बॉटलमध्ये 10 ते 20 मिनिटे राहू द्या. नंतर बॉटल ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा.