Flossing Benefits : जास्तीत जास्त लोक सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश करून आणि गुरळा करून तोंडाची स्वच्छता करतात. मात्र, काही लोक तोंडाच्या स्वच्छतेकडे फारसं लक्ष देत नाहीत. डॉक्टरांनुसार, सकाळचं हे रूटीन तुम्हाला काही जीवघेण्या आजारापासून वाचवतं. त्यामुळे सकाळी तोंडाची चांगली स्वच्छता आणि काळजी घेणं फार गरजेचं आहे.
'आस्क द डेंटिस्ट' नावाच्या चॅनलचे डॉक्टर मार्क बुरहेनने सांगितलं की, 'जर तुमचं तोंड निरोगी नसेल तर तुम्ही निरोगी राहू शकत नाही'. फ्लॉसिंग केल्याने दात चांगले साफ होतात. दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण याने निघून जातात. ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका टळतो. डॉक्टरांनुसार, फ्लॉसिंग तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
फ्लॉसिंग म्हणजे काय?
फ्लॉसिंगमुळे दातांची खोलवर स्वच्छता होते. जेवण करताना दातांमध्ये अन्न फसतं. ज्यामुळे तोंडात अनेक बॅक्टेरिया निर्माण होतात. दातांमध्ये फसलेलं अन्न कण काढण्यासाठी एका बारीक धाग्याने स्वच्छता केली जाते. म्हणजे जिथे ब्रश पोहोचू शकत नाही तिथे धाग्याने स्वच्छता करणे, यालाच फ्लॉसिंग असं म्हणतात.
गंभीर आजारांचा धोका
एका रिसर्चनुसार, तोंडात सामान्यपणे तयार होणारे बॅक्टेरिया तोंडात हानिकारक बॅक्टेरिया तयार करतात. जे मेंदूत जाऊ शकतात. ज्यामुळे विसरण्याची किंवा अल्झायमरची समस्या होऊ शकते. तसेच हृदयरोग दूर ठेवण्यासाठी तोंड चांगल्या प्रकारे स्वच्छ असणं गरजेचं आहे.
डॉ. मार्क बुरहेन यांनी सांगितलं की, रिसर्चमधून समोर आलं आहे की, ज्या लोकांच्या तोंडाचं आरोग्य फारच खराब असतं, हिरड्यांची समस्या किंवा दात पडण्याची समस्या असेल तर त्यांना हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता अधिक असते.
ब्रिटिश डेंटल फाउंडेशनचे प्रमुख डॉ. निगेल कार्टर यांच्यानुसार, जर काही लोकांच्या तोंडात सूज असेल तर हे शरीरात सूज येण्याचं कारणही बनू शकतं. तोडं मिडिएटरच्या रूपात काम करतो आणि मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा प्रवाह वाढू शकतो. जे हृदयरोगात सूज येण्याचं कारण बनू शकतं. तसेच जर तोंडातील बॅक्टेरिया ब्लडमध्ये गेले तर ते प्लेटलेट्ससोबत मिळून रक्ताच्या गाठी तयार करू शकतात. जर या रक्ताच्या गाठी हृदयापर्यंत पोहोचल्या तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचाही धोका आहे.