सोशल मीडियावर सध्या अनेक फोटोस् व्हायरल होत आहेत. यात अनेक सेलेब्रिटी आपल्या घरातील काम स्वतः करताना दिसून येत आहेत. अनेकांनी घरातील काम केल्यानंतर वजन कमी होतं, असं सुद्धा म्हटलं आहे. तुम्हाला सुद्धा वजन कमी करण्यासाठी व्यायामाचा कंटाळा आला असेल तर यावर तज्ञांचे मत काय आहे. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
याबाबात माहिती देताना जार्ज मेडिकल युनिव्हरसिटीच्या तज्ञांनी सांगितलं की कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे शारीरिक हालचाल खूप कमी प्रमाणात होत आहे. पण घाबरण्याचं काही कारण नाही. नियमीत योगा, व्यायाम करून किंवा गच्चीवर चालून, मेडिटेशन करून हा ताण- तणाव नियंत्रणात आणला जाऊ शकतो.
घराकामाचा वजन कमी होण्यावर कसा परिणाम होतो.
आपल्याला दररोज १८०० चे १९०० कॅलरीजची आवश्यकत असते. अनेकदा शारीरिक हालचाल कमी प्रमाणात होत असते. जर शरीरात तयार होत असलेल्या उर्जेचा वापर झाला नाही तर वजन वाढण्याची समस्या उद्भवते. जर तुम्ही वॉशिंग मशीनऐवजी हाताने कपडे धुत असाल तर एका तासात १४८ कॅलरीज बर्न होतात. याशिवाय भांडी घासताना १२८ कॅलरीज बर्न होतात. कपड्यांची इस्त्री करत असताना ८० कॅलरीज बर्न होतात. तर झाडू मारत असताना जवळपास १५६ कॅलरीज बर्न होतात. लादी पुसत असताना १७० कॅलरीज बर्न होतात.
घरकामात व्यस्त असाल तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागणार नाही असं तज्ञांचं मत आहे. त्यासाठी रोजचं रुटीन ठरवणं महत्वाचं आहे. जेवणाची, झोपण्याची आणि झोपेतून उठण्याची वेळ निश्चित असायला हवी. रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीतकमी २- ३ तासांचं अंतर असावं.