वॉशिंग्टन - कोरोना महामारीच्या या काळात साधी शिंकदेखील भयभीत करत आहे. मात्र, आपल्याला सर्वसाधारणपणे ज्या व्हायरसमुळे सर्दी आणि खोकला होतो, तोच व्हायरस कोरोनासाठी कारणीभूत असलेल्या सार्स-कोव-2 पासूनही संरक्षण करू शकतो, असा दावा एका नव्या आध्ययनात करण्यात आला आहे. एक्सपेरिमेंटल मेडिसिन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या आध्ययनानुसार, सर्वसामान्य सर्दी-खोकल्यासाठी कारणीभूत ठरणारा रायनोव्हायरस इंटरफेरॉन-प्रेरित जीनची सक्रियता वाढविण्याचे कामही करतो. (Exposure to common cold virus may protect from coronavirus says US scientist)
VivaTech : ...तर कोरोना विरोधातील आमची लढाई कमकुवत पडली असती - पंतप्रधान मोदी
हे जीन इम्यून सिस्टममध्ये सुरुवातीच्या मॉलीक्यूलला सक्रिय करतात. हे मॉलीक्यूल सर्दी-खोकल्यामुळे प्रभावित श्वसन मार्गात सार्स-कोव-2 च्या वाढीला आळा घालू शकतात. अध्ययनाचे प्रमुख संशोधक आणि अमेरिकेच्या येल स्कूल ऑफ मेडिसिनमधील असिस्टन्ट प्रोफेसर अॅलेन फॉक्समॅन यांनी म्हटले आहे, की कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, अशा प्रकारे संक्रमणावर उपचार होऊ शकतो.
ते म्हणाले, ही इंटरफेरॉनने रुग्णावरील उपचाराची एक पद्धत आहे. इंटरफेरॉन इम्यून सिस्टीमचा एक प्रोटीन असतो. हा औषध स्वरुपातही उपलब्ध आहे. अॅलेन म्हणाले, 'मात्र, हे सर्व वेळेवर अवलंबून आहे.' या पूर्वीच्या अध्यनांतून हे स्पष्ट झाले होते, की इंटरफेरॉनच्या उच्च स्तराचा संबंध आजारात खराब परिणाम आल्याशी असू शकतो. हा इम्यून रिस्पॉन्स अधिक सक्रिय करू शकतो. खरे तर, इंटरफेरॉन-प्रेरित जीन कोरोना संक्रमणात संरक्षण करू शकतात, हे नव्या अध्ययनातून समजते.