सतत बदलणाऱ्या तापमानाचा लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, व्हायरल फ्लू व्यतिरिक्त, आजकाल लोकांना हाय ब्लड प्रेशर आणि डायबेटीस यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांचाही सामना करावा लागत आहे. मात्र आता ब्रेन हॅमरेजच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
TOI मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) च्या न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र कुमार म्हणाले की, उन्हाळ्यात सामान्य दिवसांच्या तुलनेत ब्रेन हॅमरेजच्या प्रकरणांमध्ये जवळपास 20% वाढ झाली आहे. या वृद्धीमागचं मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्यात अनियंत्रित ब्लड प्रेशर आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळ्यात ब्लड प्रेशरच्या लेव्हलवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. पुढील समस्या टाळण्यासाठी लोकांनी सतर्क राहणं आणि वेळेवर मेडिकल मदत घेणं महत्त्वाचं आहे. RIMS च्या मेडिसिन, न्यूरोलॉजी आणि कार्डिओलॉजी विभागातील रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. गेल्या महिन्यात, रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये 1988 हून अधिक रुग्णांनी उपचार घेतले, त्यापैकी सुमारे 35% रुग्णांना औषध, न्यूरोलॉजी आणि कार्डिओलॉजी विभागात उपचार आवश्यक होते.
उच्च तापमानात शरीरावर जास्त ताण
उन्हाळ्यात तापमानातील चढ-उतारामुळे शरीरावर खूप ताण येतो. यामुळे नसा आकसतात आणि ब्ल़ड प्रेशर वाढू शकतं. ब्रेन हॅमरेजसाठी ब्ल़ड प्रेशर हा एक प्रमुख रिस्क फॅक्टर आहे. याशिवाय उष्णतेमुळे शरीरात डिहायड्रेशन होऊन ब्ल़ड प्रेशर वाढू शकतं.
'अशी' घ्या काळजी
उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात जाणं टाळणं, भरपूर पाणी प्या आणि हलका, द्रवयुक्त आहार घेण्याचं तज्ञ सुचवतात. तसेच, नियमित व्यायाम करा आणि तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेत राहा. याशिवाय अचानक तीव्र डोकेदुखी, बोलण्यात अडचण, बधीरपणा किंवा अशक्तपणा यांसारखी लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. शक्य तितक्या लवकर उपचार करून गंभीर समस्या टाळता येतात.