सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे वारंवार तहान लागते (Extreme Thirst). कितीही पाणी प्यायलं तरी तहान काही शमत नाही. पण वारंवार पाणी प्यावंसं वाटणं किंवा तहान लागणं हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. हा आजार म्हणजे डायबेटिस (Symptoms of diabetes). मधुमेहाच्या मुख्य लक्षणांपैकी एक तहान हे लक्षण आहे.
मधुमेह अर्थात डायबेटीस (Diabetes) हा विकार म्हणजे देशातल्या नागरिकांपुढचं मोठं संकट ठरलं आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांतल्या व्यक्तींना मधुमेह होत असल्याचं अलीकडे दिसून येत आहे. घरातल्या एकाही व्यक्तीला डायबेटीस नाही, अशी घरं आजच्या घडीला सहज शोधून सापडण्यासारखी राहिलेली नाहीत. बदललेली जीवनशैली, चित्रविचित्र प्रकारचा आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप आणि आनुवंशिक अशा कित्येक कारणांमुळे डायबेटीस होतो, होऊ शकतो.
डायबेटीस एकदा झाला की तो औषधोपचार, पथ्यं आदींच्या साह्याने नियंत्रित राखता येतो; मात्र पूर्णपणे बरा कधीच होत नाही. या विकारामुळे हळूहळू शरीरातल्या सर्व अवयवांवर विपरीत परिणाम होतो; म्हणून त्याला सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. इतर विकारांप्रमाणेच मधुमेह होण्याच्या आधीही काही लक्षणं दिसतात, जाणवतात; मात्र ती नीट लक्षात घेतली नाहीत, तर डायबेटीस होतोच. लक्षणं वेळीच लक्षात आली, तर कदाचित लवकर औषधोपचार लवकर सुरू करून काही उपयोग होऊ शकतो. म्हणूनच डायबेटीसची (Symptoms of Diabetes) लक्षणं ओळखता येणं गरजेचं आहे.
डायबेटीस झालेल्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिन काम करणं बंद करत असल्यामुळे त्याच्या रक्तातली साखरेची पातळी वाढते. ही जास्तीची साखर किडनी (Kidney) फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे ती साखर मूत्राद्वारे बाहेर पडते. त्यामुळे डायबेटीस सुरू झालेल्या व्यक्तींना लघवीला जास्त वेळा होतं. हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. जास्त वेळा लघवी झाल्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होत जातं. लघवीला जास्त वेळा होत असल्याचं लक्षात आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि तपासणी करून घ्यावी. सतत लघवी होत असल्याने शरीरातलं पाणी कमी होतं आणि वारंवार तहान लागते. तसंच डायबेटीस झाला असेल, तर भूक लागण्याचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास त्यांकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
डायबेटीसचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे वजन घटणं आणि संबंधित व्यक्ती बारीक होणं. रक्तातली साखर वाढल्यामुळे शरीरात फॅट्स साठवण्याच्या पद्धतीत बदल घडतो आणि Weight Loss होऊ शकतो. संबंधित व्यक्ती अचानक बारीक होऊ लागते, वजन घटू लागतं. अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वजन कमी झाल्यावर साहजिकच थकवा (Tiredness) लवकर येतो. डोकेदुखी होते, कदाचित दृष्टी अंधूकही होऊ शकते. हृदयाची धडधड वाढते. अशी काही लक्षणं दिसल्यास लगेचच ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) तपासून घ्यावी.