सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कॉम्प्युटर, मोबाईल, टीव्ही हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र याच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहे. डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत. डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे, थकवा जाणवणे, दृष्टी कमी होणे या सारख्या समस्या उद्धभवत आहेत. तुम्ही जर सलग दोन तासांपेक्षा अधिक काळ संगणकावर काम करत असाल तर ते तुमच्या डोळ्यासाठी हानीकारणक आहे.
सध्या देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोना काळात मुलांचा अभ्यास देखील ऑनलाईन झाला आहे. ते मोबाईल किंवा लॅपटॉपच्या मदतीने अभ्यास करतात, अशा परिस्थितीमध्ये त्यांना देखील डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. डोळे हा शरिराचा अतिशय नाजूक पार्ट असतो. डोळ्याच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. आज आपण डोळ्याची काळजी कशी घ्यावी, संगणकावर काम करताना काय करावे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
डोळ्यासाठी आरोग्यदायी असलेले पदार्थतुम्हाला जर तुमच्या डोळ्याचे आरोग्य दीर्घकाळासाठी उत्तम ठेवायचे असेल तर तुम्ही न चुकता दररोज आपल्या आहारामध्ये मधाचा वापर करा. मधामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते. नारळ किंवा तिळाच्या तेलाने रात्री झोपताना पायाच्या तळव्याची मॉलिश करा. यामुळे डोळे निरोगी राहतात, तसेच दृष्टीदोशाची समस्या उद्भवत नाही. जेवताना ज्या पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण मोठ्याप्रमाणात आहेत अशा पदार्थांचा समावेश करा. मुगदाळ आणि पालेभाज्यांचा जेवणात नियमित उपयोग करा. तसेच आवळा देखील डोळ्यांच्या समस्यांवर उत्तम फळ आहे. आवळा नियमित खाल्ल्याने दृष्टी अधिक चांगली होण्यास मदत होते.
संगणकावर काम करताना काय काळजी घ्याल?तुम्ही जर कामासाठी नियमित संगणकाचा वापर करत असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. संगणकावर काम करत असताना आधुनमधून ब्रेक घेत चला. सलग दोन घट्यांपेक्षा अधिक काळ काम करू नका. थोड्याथोड्या अंतराने डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तसेच डोळ्यांची उघडझाप चालू ठेवा. या गोष्टी अमलात आणल्यास नक्कीच तुमच्या डोळ्यांच्या अनेक समस्या कमी होऊ शकातात.