डोळे हे मानवाला मिळालेलं एक वरदान आहे असं आपण नेहमी ऐकतो. तसेच थोरामोठ्यांकडून डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात येतो. सध्या बरेच जण आपला संपूर्ण वेळ कम्प्यूटर समोर घालवतात. अशा लोकांना डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हळूहळू त्यांच्या डोळ्यांची दृष्टी कमजोर होऊ लागते. त्यामुळे त्यांना निरोगी ठेवण्यासाठी शरीराप्रमाणेच डोळ्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं असतं. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांनाही व्यायामाची गरज असते. जाणून घेऊयात डोळ्यांच्या अशा 6 व्यायामांबाबत जे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी फायदेशीर ठरतात.
- काम करताना प्रत्येक 3 ते 4 तासांनंतर आपले डोळे थोडा वेळासाठी बंद करा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
- आपल्या डोळ्यांची बुबुळं उजव्या-डाव्या आणि वरच्या आणि खालच्या दिशेला फिरवावी. त्यामुळे डोळ्यांचा व्यायाम होतो.
- तुमचा अंगठा दोन्ही भुवयांच्यामध्ये ठेवा आणि दोन्ही डोळ्यांनी त्या दिशेने पाहा.
- एखाद्या भिंतीवर एक बिंदू काढा आणि त्यावर ध्यान केंद्रित करा. असे जास्तीत जास्त वेळा करण्याचा प्रयत्न करा.
- दिव्याच्या ज्योतीकडे एकटक बघा. यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासोबतच एकाग्रता वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरतात.
- सकाळच्या वेळी हिरव्या गवतावर चालणं डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. गवतावर दव पडलेलं असताना काही वेळ अनवाणी पायाने त्यावर चालणं देखील फायदेशीर ठरतं.