भारतात कोविड -१९ च्या दुसर्या लाटेने कहर केल्यापासून बर्याच खोट्या अफवा समोर आल्या आहेत. आता, सीएसआयआरच्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शाकाहारी लोक आणि स्मोकिंग करत असलेल्यांना कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती व्हायरल झाली होती. पण यात काहीही अर्थ नसल्याचं समोर आलं आहे. धूम्रपान करणारे आणि शाकाहारी लोक कोविड -१९ च्या तुलनेत कमी सुरक्षित आहेत.
या व्हायरल पोस्टमध्ये असे सूचित केले गेले आहे की. 'कोरोनाव्हायरस हा श्वसन रोग असूनही धूम्रपान करणे फायदेशीर ठरू शकते. हे देखील सूचित केले होते की कोविड विरूद्ध रोग प्रतिकारशक्ती प्रदान करण्यात फायबर समृद्ध शाकाहारी अन्नाची भूमिका असू शकते.'
(Press Information Bureau ) पीआयबी या दाव्याची सत्यता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. यानुसार सध्या शाकाहारी आहार आणि धूम्रपान कोविडपासून संरक्षण देऊ शकते अशा सेरॉलॉजिकल अभ्यासानुसार कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. सीएसआयआरने म्हटले आहे की या दाव्याबाबत त्यांनी कोणतीही प्रेस नोट जारी केलेली नाही.
रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की @ सीएसआयआर_आयएनडी सर्वेक्षणात धूम्रपान करणारे आणि शाकाहारी लोक कोरोनापासून सुरक्षित आहे. याऊलट पीआयबी फॅक्ट चेक दरम्यान दिसून आलं की, शाकाहारी आहार आणि धूम्रपान COVID19 पासून संरक्षण देऊ शकते, असा कोणताही निष्कर्ष सेरॉलॉजिकल अभ्यासावर आधारित काढण्यात आलेला नाही. धूम्रपान करण्यासंबंधी नकारात्मक बाबी नोंदवल्या गेल्या आहेत. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सत्यता शोधणे आवश्यक आहे.