तुम्ही इंटरनेटवर गेलात आणि वजन कमी करण्याचे उपाय शोधलात तर तुम्हाला अशी अनेक आर्टिकल्स मिळतील ज्यात ग्रीन टी वजन कमी करते असे लिहिलेले असेल. वजन कमी करण्याच्या उपायामध्ये ग्रीन टी असतेच असते. पण ग्रीन टी मुळे तुमचे वजन खरंच कमी होते का? काय आहे याचे उत्तर...
अमेरिकन हेल्थ जनरल हेल्थलाईनमध्ये दिलेल्या संशोधनानुसार ग्रीन टी प्यायल्यामुळे वजन कमी होते का? याला आधार काय आहे? यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या जनरलमध्ये नमुद केल्यानुसार ग्रीन टीचा आपले मॅटाबॉलिज्म आणि एनर्जी सायकलव प्रभाव पडतो. जर तुम्ही साखरेशिवाय प्याल तर त्यामुळे मिळणाऱ्या कॅलरीजही कमी असतील. चला तर मग जाणून घेऊया ग्रीन टी आपल्या शरीरात कशाप्रकारे काम करते. मात्र, हे तथ्य लक्षात ठेवून की ग्रीन टीचं काम वजन घटवणे नाही.
ग्रीन टीमधील घटक लोह मॅग्नेशिअमकॅलशिअमकॉपरझिंक फॉस्फरसव्हिटॅमिन सीव्हिटॅमिन एव्हिटॅमिन बी १व्हिटॅमिन बी १२
ग्रीन टीचा शरीरावरील प्रभावग्रीन-टीमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्यांचा तुम्हाला प्रचंड फायदा होतो यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारते. रक्तातून ऑक्सिजनचा होणारा पुरवठा वाढल्याने पेशींचे पोषण होते आणि नुकसान आपोआप कमी होते.
तळलेल्या गोष्टी खाल्ल्यानंतर ग्रीन टी प्याजेव्हा आपण समोसा अथवा भजीसारखे पदार्थ खाल्ल्यानंतर ग्रीन टी पितो तेव्हा आपल्याला त्याचा फार फायदा होतो. हे पदार्थ शरीरात गेल्यावर आतड्यांमध्ये चिकटून बसतात. ग्रीन टी पिल्यावर हे चिकटलेले पदार्थ बाहेर निघतात व आतडे स्वच्छ होतात. त्याचबरोबर जे पदार्थ पचण्यास जड असतात ते ग्रीन टीच्या सेवनाने पचण्यास मदत होते
कॅलरीज वाढण्याची भीती नाहीग्रीन टीमध्ये कॅलरीज नसतात त्यामुळे ग्रीन टी प्यायल्याने कॅलरीज वाढण्याची कोणतीही भीती नसते. फक्त यात साखर किंवा मध टाकून पिऊ नका.ग्रीन टी आणि आपलं मेटाबॉलिज्मआपल्या शरीरात मेटाबॉलिज्म नावाचे एक घटक असतो. जो आपण काहीही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर त्याचे रुपांतर ताकदीत करण्यासाठी शरीराला मदत करतो. ग्रीन टी मधील घटक शरीरातील मेटाबॉलिज्म घटकाला वाढवतात.