देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरू असताना दुसरीकडे वॅक्सीनेशनचं कामही वेगाने सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये १८ वर्षावरील लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. अशात यावरून सोशल मीडियात वेगवेगळ्या अफवाही पसरत आहेत. औषधांपासून ते अनेक गोष्टींना कोरोनापासून बचावाचे उपाय सांगितले जात आहेत. सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. ज्यात कोरोनाच्या लसीसाठी रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले जात आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने याची चौकशी केली आणि सत्य काय आहे ते सांगितलं.
सोशल मीडिया, व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल झाला असून १८ वर्षावरील लोकांनी त्यातील लिंकवर क्लिक करून लसीसाठी रजिस्ट्रेशन करण्यास सांगितलं जात आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने हा मेसेज फेक असल्याचं सांगितलं.
काय आहे मेसेज?
पीआयबीच्या टीमने ट्विट करून लिहिले की, एका मेसेजमधून दावा केला जात आहे की, १८ वर्षावरील सर्व लोकांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून एक मोबाइल अॅप डाऊनलोड करा. त्याद्वारे लसीसाठी रजिस्ट्रेशन करा. PIB Fact Check टीमने हा मेसेज फेक असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी सांगितले की, वॅक्सीनच्या रजिस्ट्रेशनसाठी http://cowin.gov.in या वेबसाइटलाच भेट द्या.
कुठे कराल वॅक्सीनसाठी रजिस्ट्रेशन?
१८ पासून वरच्या वयोगटातील लोक आता वॅक्सीन घेण्यासाठी कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु किंवा उमंग अॅपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करू शकतात. या प्लॅटफॉर्म माध्यमातूनच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. सरकारी हॉस्पिटल्ससोबतच प्रायव्हेट वॅक्सीनेशन सेंटरवरही तुम्ही वॅक्सीन घेऊ शकता. मात्र, प्रायव्हेट वॅक्सीनेशन सेंटरवर तुम्हाला ठराविक रक्कम द्यावी लागेल.