- मयूर पठाडेखरं सांगा, तुमच्या पायांचा कधीकधी घाणेरडा वास येतो की नाही? विशेषत: उन्हाळ्यात आणि पावसाळ्यांत. अनेकांना हा त्रास असतो, पण त्यांच्यापेक्षा त्यांच्या आजूबाजूला जी माणसं असतात, त्यांना या घाण वासाचा जास्त त्रास होतो. कधी या माणसापासून आणि या वासापासून लांब जातो असं त्यांना होतं.आताही पावसाळ्याची सुरुवात आहे आणि अनेकांना या अनुभवाला सामोरं जावं लागेल. पण थोडी काळजी घेतली तर या नकोशा अन् त्रासदायक अनुभवातून तुमची सुटका होऊ शकेल आणि इतरांना तुमच्यापासून लांब जावंसं, पळावंस वाटणार नाही. पायांचा वास घालवण्यासाठी काय कराल?
१- तुम्ही जर मद्यसेवन आणि धुम्रपान करीत असाल, तर ते ताबडतोब बंद करा किंवा त्याचं प्रमाण जितकं कमी करता येईल तितकं कमी करा. २- मद्य आणि धुम्रपानामुळे काही विषारी पदार्थ तुमच्या शरीरात जातात. या विषारी घटकांचाही अतिशय घाण, उग्र दर्प येतो.३- पाय दररोज न चुकता आणि येताजाता स्वच्छ धूत जा. त्यासाठी पायावर नुसतं पाणी टाकणं किंवा ते चोळून धुणं पुरेसं नाही. अॅँटिबॅक्टेरिअल साबणानं आपले पाय दिवसातून किमान दोन वेळा तरी धुतलेच पाहिजे.
३- व्हिनेगार बाथ- एक भाग पाणी आणि दोन भाग व्हिनेगारच्या मिश्रणात काही वेळ पाय बुडवून ठेवा. त्यामुळे बॅक्टेरियाचा नाश होईल आणि पायांचा वासही येणार नाही.४- सॉल्ट वॉश- अर्धा कप मीठ आणि चार कप पाणी यापासून बनवलेल्या मिश्रणात रोज किमान दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून बसा. पायांचा वास येणं बंद होईल. ५- बेकिंग सोडा- बेकिंग सोडा, कॉर्न स्टार्च आरारुट पावडरनं पाय रोज स्वच्छ धुतले तर मॉइश्चर कमी होण्यास मदत होईल आणि पायांच्या दुर्गंधीपासूनही बचाव होईल. ६- सॉक्स- पायांचा, सॉक्सचा वास येतो, म्हणून सॉक्सचं घालायचे नाहीत, असा वेडेपणा कधीच करू नका, उलट त्याची मोठीच किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. किमान पावसाळ्यात तरी रोज सॉक्स घालणं गरजेचंच आहे. एक काळजी मात्र अवश्य घ्या.. रोज स्वच्छ आणि धुतलेले सॉक्स घालणं आवश्यक आहे. तर पायाच्या दुर्गंधीचा त्रास बऱ्यापैकी कमी होऊ शकेल.