शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

परीक्षेत ‘फेल्युअर’? कमी मार्क्स, पोरानं घराण्याचं नाव घालवलं? भविष्याचं ‘वाटोळं’? अ‍ॅडमिशनचा बोऱ्या?..

By admin | Published: May 31, 2017 4:13 PM

तुम्हाला मार्क्स हवेत की तुमचं मूल? रिझल्टच्या काळात खास पालकांसाठी नऊ टिप्स..

- मयूर पठाडेसध्या परीक्षांच्या रिझल्टचे दिवस आहेत. दहावी, बारावी, त्याचबरोबर सीईटी.. अशा अनेक परीक्षांचे रिझल्ट लागताहेत.. काहींचे रिझल्ट लागलेत, तर काहींचे लागायचेत. या परीक्षांमध्ये ज्यांना खरोखरच चांगले, आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडलेत किंवा पडतील, त्यांचं ठीक आहे, पण बहुतेकांचं तसं होत नाही. कितीही मार्क्स पडलेत तरी ते पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही कमीच वाटतात. अर्थात आजच्या स्पर्धेच्या युगात ते साहजिकही आहे. कारण गुणांच्या या खैरातीत कितीही मार्क्स पडलेत तरीही आजकाल हव्या त्या शाखेला अ‍ॅडमिशन मिळण्याची मारामार.

 

पालकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सारेच जण रिझल्टच्या दिवसाची प्राण कंठात आणून वाट पाहात असतात. या परीक्षांमध्ये फेल होणं तर जाऊ द्या, पण कमी मार्क्स पडणं म्हणजेही फेल्युअरच मानलं जातं. अशावेळी विद्यार्थ्यांना प्रचंड टेन्शन येतं. आपल्या भविष्याचं, भवितव्याचं काय याचं मोठंच प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर आ वासून उभं राहातं. याशिवाय आपला हा ‘निकाल’ जर घरी कळला तर काय, आईवडील, पालक काय म्हणतील, किती झापतील, त्यांनी आणि आपणही घेतलेल्या आर्थिक, शारीरिक कष्टांचं काय चिज झालं.. म्हणून त्यांच्या डोक्यावर अक्षरश: आभाळ कोसळतं.अशावेळी बऱ्याचदा पालकही हतबल होतात आणि आपली सगळी भडास, फ्रस्ट्रेशन ते पाल्यांवर उतरवतात. पण हीच खरी वेळ आहे, आपल्या पाल्यांना समजून घेण्याची. पालक म्हणून तुम्ही जर सजग असाल, तर परीक्षेतल्या या मार्कांचं आणखी टेन्शन मुलांवर लादू नका. नाहीतर तुमचं मूल हातचं जाऊ शकतं. याच काळात ‘फेल्युअर’मुळे अनेक विद्यार्थी आत्महत्येचा मार्गही चोखाळतात. खरं तरी परीक्षेत नापास किंवा कमी मार्क्स मिळणं हे फेल्युअर नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्याचा हा मार्ग नव्हेच.

 

पालकांनीही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की त्यांना खरोखर मार्क्स हवे आहेत, की आपलं मूल? फेल्युअरच्या टेन्शनपायी त्यानं नको ते करून घेतलं तर शेवटी हाती काय उरणार आहे?त्यामुळे खरंतर यावेळी विद्यार्थ्यांऐवजी पालकांनीच समजून घेण्याची गरज आहे.पालकांसाठी काही खास टिप्स१- आपल्या मुलाला खरोखरच कमी मार्क्स मिळाले असतील किंवा तो फेल झाला असेल तर जाहीरपणे आपली निराशा दाखवण्याऐवजी मुलाला समजून घ्या. त्याच्या पाठीशी उभे राहा. यशापेक्षाही अपयशातून माणूस सर्वाधिक शिकत असतो. तुमचा हाच सपोर्ट मुलाला नवी उभारी देऊन जाईल.२- लक्षात ठेवा, आपल्या पाल्यांची इतरांबरोबर तुलना कधीही करू नका. ‘तुझ्याच बरोबरचा ना तो? बघ, त्याला किती मार्क्स मिळाले आणि तुला?’ अशी तुलना मुलांचा आत्मविश्वासच खचवून टाकते.३- प्रत्येक मुलाची कपॅसिटी, स्ट्रेंथ, क्षमता, आवड वेगवेगळी असते. कोणी अभ्यासात चांगला, कोणी खेळात, कोणी तार्किक बुद्धिमत्तेत, कोणी कशात, तर कोणी कशात.. एका गोष्टीत फेल म्हणजे साऱ्यात फेल, असं कधीच होत नाही.४- अपयशामुळे आपलं मूलही निराशच झालं असेल. त्याच्या शेजारी बसा. प्रेमानं त्याला जवळ घ्या. तो कशात कमी पडला हे समजून घ्या आणि पुढच्या वेळी त्या गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करा.५- आपल्या मुलाची स्ट्रेंग्थ काय आहे आणि विकनेस कशात आहे, याची पालक म्हणून आपल्याला कल्पना असलीच पाहिजे. त्यानुसारच त्यांच्या अभ्यासाचा वेळ आणि फोकस केंद्रित करायला हवा. ६- आपल्या अपेक्षा कायम वास्तव, रिअलिस्टिक आणि साध्य करता येण्याजोग्या असू द्या. नाहीतर या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपलं मूलही कायम दडपलेलंच राहील आणि आपल्याही वाट्याला कायम नैराश्यच येईल. आत्ता आपण ज्यावरून नाराज झाला आहात किंवा मुलाला झापताहात, त्याचं कारणही हेच आहे का, याकडे एकदा स्वत: बघा आणि आत्मपरीक्षण करा.७- अपयश पचवायला शिकणं हेदेखील एक खूप मोठं शिक्षण असतं, जे कधीच पैसे देऊन शिकायला मिळत नाही हेदेखील लक्षात घ्या.८- आत्ताच्या रिझल्टमुळे किंवा (पुढे लागणाऱ्या रिझल्टनंतर) आपलं मूल नैराश्यात गेलंय का, ते एकटं एकटं राहतंय का, स्वत:शीच खूप कुढतंय का, ते खूप संताप करतंय का, त्याची भूक आणि झोप खूपच कमी झालंय का.. अशा गोष्टींकडेही बारीक लक्ष द्या.. वेळीच त्याला आधार द्या.. स्वत:चं काही बरंवाईट करून घेण्यापूर्वीची ही सर्वसाधारण लक्षणं आहेत एवढं लक्षात असू द्या.. आपलं मूल असं काही करणार नाही, इतका काही गुन्हा त्यानं केलेला नाही. त्याला घालूनपालून बोलू नका. चारचौघात अपमान करू नका.. ९- तुमचं मूल तुमच्याजवळ आहे, भविष्याच्या आव्हानांसाठी ते तयार आहे, यापेक्षा अधिक तुम्हालाही काय हवं?