तासंतास खुर्चीवर बसून काम केल्याने आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतात. पण याचा सर्वात जास्त प्रभाव आपल्याला आपल्या पोटावर बघायला मिळतो. कंबरेजवळची अतिरिक्त चरबी हृदयरोग, डायबिटीस आणि काही प्रकारच्या कॅन्सरचं कारण ठरते. तुम्ही अनेक लोक पाहिले असतील ज्यांच्या पोटाने बेढब आकार घेतला. आपल्या वाढलेल्या पोटामुळे हे लोक तणावाचे शिकारही होतात.
पोट आणि पोटाच्या आजूबाजूला सर्वात जास्त चरबी जमा होते. जेव्हा विषय वजन कमी करण्याचा येतो तेव्हा चरबी कमी करणं सर्वात अवघड काम बनतं. पण द ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिननुसार, हाय इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंगने ही चरबी २९ टक्के अधिक कमी केली जाऊ शकते. (हे पण वाचा : व्यायामाला वेळ नाही? मग फक्त उभे राहा, तुमच्या कॅलरीज अन् फॅट्स चुटकशीसरशी बर्न होतील)
मॅकमास्टर यूनिव्हर्सिटीचे प्रो. मार्टिन गिबाला म्हणाले की, 'यासाठी २० मीटरपर्यंत ८ ते १० वेळा रनिंग केली तर याने वेगाने चरबी कमी होते. वेगाने धावायला सुरूवात करण्याआधी १० ते १५ मिनिटांपर्यंत वार्मअप आवर्जून करा. यासाठी जॉगिंग करू शकता किंवा फिल्डवर हळूवार काही पावलं चालावे. याने क्रॅम्प येण्याचा धोका राहतो. तसेच शरीरावर हलका घामही येईल.
धावताना तुमचा हार्ट रेट ८० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. आपला जास्तीत जास्त हार्ट रेट जाणून घेण्यासाठी २२० मधून वर्तमान वय कमी करा. म्हणजे ४० वर्षाच्या व्यक्तीचा जास्तीत जास्त हार्ट रेट २२०-४० = १८० होईल. या हिशेबाने ८० टक्के क्षमता म्हणजे हार्ट रेट १६० पेक्षा अधिक असू नये. हे जाणून घेण्यासाठी मोबाइल अॅपचा वापर करू शकता.
कंबर आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी स्वीमिंग हा सुद्धा एक चांगला व्यायाम आहे. रोज स्वीमिंग केल्याने शरीरात जमा होणारी जास्तची चरबी कमी होऊ लागते. स्वीमिंगने केवळ वजन कमी होत नाही तर शरीराला चांगला शेपही मिळतो.