नवरात्रात हल्ली अनेकजण उपवास करतात. कुणी श्रद्धा म्हणून. कुणी मित्र करतात म्हणून कुणी वजन कमी करायचं म्हणून कुणी डिटॉक्स म्हणून. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील पण 9 दिवस उपवास करणार्यांचं प्रमाण मोठं. मात्र क्रेझी डाएट केलं आणि फक्त फळं, पाणी किंवा ज्युस पिऊन राहिलं म्हणजे डिटॉक्स होईल असं काही नाही. तुम्ही उपवास करत असाल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा. त्या करा, तरच उपवासाचे लाभ मिळतील.
1) दिवसाची सुरुवात, म्हणजेच सकाळी उठल्याउठल्या घोटभर कोमट पाणी किंवा दुध घ्या. घोटभरच खूप पाणी किंवा दूध पिऊ नका.2) त्यानंतर एखादं फळ खा. खरं तर रात्री पाण्यात भिजवलेले अंजीर-मनुका-बदाम खाणं उत्तम. फळं खाणार असाल तर डाळींब किंवा चिकू, पपई खा. केळ नको.