Fat to fit : कोरिओग्राफर गणेश आचार्यने असे केले तब्बल ८५ किलो वजन कमी !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2017 7:25 AM
राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य डान्स बरोबरच त्याच्या वजनामुळेही ओळखला जातो.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य डान्स बरोबरच त्याच्या वजनामुळेही ओळखला जातो. मात्र आता गणेश आचार्यने १०-२० किलो नव्हे तर तब्बल ८५ किलो वजन कमी केले आहे. गणेश आचार्यचे काही फोटो सोशल मीडियावर खूचप व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून सर्वचजण चकित होत आहेत. या फोटोंमध्ये गणेश पहिल्यापेक्षा खूपच सळपातळ दिसत आहे. गणेच नुकताच आपल्या ‘भिकारी’ या मराठी चित्रपटातील गाण्याच्या लॉन्चिंगच्या वेळी दिसले होते. त्यावेळी सर्वांच्या नजरा त्याचा हा लूक पाहून चकित होत होत्या. आपल्या वजन घटविण्याच्या बाबतीत गणेशने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘हे माझ्यासाठी कठीण होते. मी गेल्या दिड वर्षापासून आपल्या शरीरावर काम करीत होतो. २०१५ मध्ये ‘हे ब्रो’ या चित्रपटात मी ३०-४० किलो वजन वाढविले होते आणि त्यानंतर माझे वजन २०० किलोपर्यंत पोहचले होते. आता तेच वजन कमी करीत आहे.’ २०१३ मधील ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातील ‘हवन करेंगे’ या गाण्याला कोरिओग्राफसाठी गणेश आचार्यला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गणेशला आतापर्यंत लोकांनी लठ्ठच पाहिले आहे. याच कारणाने गणेशला स्वत:ची इमेज बदलायची आहे. गणेशने आतापर्यंत ८५ किलो वजन कमी केले आहे.