जेव्हा वजन कमी करण्याबाबत चर्चा होते तेव्हा तुम्ही फॅट बर्न आणि कॅलरी बर्न असे शब्द ऐकले असतील. काही लोकांच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की, फॅट बर्न आणि कॅलरी बर्नमध्ये नक्की फरक काय? किंवा वजन कमी करण्यासाठी फॅट बर्न फायदेशीर ठरतं की, कॅलरी बर्न? खरं तर या प्रश्नांची उत्तर जाणून घेतल्याशिवाय तुम्ही तुमचा वजन कमी करण्याचा निश्चय अजिबात पूर्ण करू शकत नाही. कारण फॅट बर्न आणि कॅलरी बर्न दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असून या सर्वांचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो. वजन कमी करण्यासाठी काय आहे आवश्यक?
फॅट बर्न असो किंवा कॅलरी बर्न दोन्ही वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या उद्देशाने पाहत असाल तर, फॅट बर्न सर्वात जास्त महत्त्वाचं ठरतं. परंतु, यासाठीही कॅलरीवर विशेष लक्ष देण्याची गरज असते. कारण जर आहारातून तुम्ही जास्त कॅलरी घेत असाल तर तुम्ही फॅट बर्न करण्यासाठी सफल होणार नाही.
फॅट आणि कॅलरी बर्न यांमधील मुख्य अंतर काय?
आपण जे काही खातो किंवा पितो, त्यांमधून मिळाऱ्या कॅलरी शरीर उपयोग करून खर्च करतो किंवा ज्या काही उरतात त्या उर्जेच्या रूपात संग्रहित होतात. शरीर आपल्या प्रक्रियेनुसार, अतिरिक्त कॅलरी ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतरित करतात. जे फॅट्सच्या रूपात पेशींमध्ये जमा होत राहतं.
जेव्हा तुम्ही शारीरिक मेहनत किंवा शारीरिक कष्टाची कामं करता, तेव्हा शरीर लगेच कॅलरीचा उपयोग करतं. परंतु, जेव्हा कॅलरीची कमतरता असते, त्यावेळी शरीर फॅट बर्न करण्यास सुरुवात करतं.
जेव्हा तुम्ही कमी कॅलरी डाएट घेता आणि एक्सरसाइज वाढवता. त्यावेळी शरीरातील पेशींमध्ये जमा झालेल्या फॅट्समुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळेच तुमचा वेट लॉस प्लॅन व्यवस्थित काम करण्यास मदत करतो.
दोघांमध्ये असा साधा ताळमेळ...
वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित करण्यासाठी फॅट आणि कॅलरी बर्न करण्यामध्ये समन्वय साधणं आवश्यक असतं. जर तुम्ही हे व्यवस्थित फॉलो केलं नाही तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.