डॉ. अश्वत्ती हरिदास
मूत्रपिंड रोग, ज्याला वृक्क रोग असेही म्हणतात, मधुमेह, उच्च रक्तदान आणि अनुवांशिक घटकांसह विविध कारणांमुळे होऊ शकतो. मूत्रपिंडाच्या आजाराचे लवकर निदान ही यशस्वी उपचार आणि व्यवस्थापनाची गुरूकिल्ली आहे. या लेखात आपण मूत्रपिंडाच्या आजाराच्या लक्षणांची चर्चा करू.
मूत्रपिंड आजाराची लक्षणे:
सुरुवातीच्या टप्प्यात, मूत्रपिंड रोगाची सहज लक्षात येतील अशी लक्षणे नसू शकतात. मात्र, आजार जसा वाढतो तसे पुढील लक्षणे विकसित होऊ शकतात:
1.थकवा: थकवा हे मूत्रपिंड रोगाचे समान्य लक्षण आहे. जेव्हा मूत्रपिंड व्यवस्थित कार्य करीत नाहीत, शरीरात टाकाऊ पदार्थ जमा होऊ शकतात, त्यामुळे थकव्याची भावना निर्माण होते.
2.सूज: सूज, ज्याला शोफ सुद्ध म्हणतात, जेव्हा मूत्रपिंड नीट कार्य करीत नाही तेव्हा पाऊले, घोटे, पाय किंवा चेहर्यावर सूज येते. असे होण्याचे कारण म्हणजे शरीरातील द्रवाच्या संतुलनाच्या नियमानाचे कार्य मूत्रपिंड करतात.
3.लघवी क्रियेतील बदल: लघवी क्रियेतील बदल हे मूत्रपिंड रोगाचे लक्षण असू शकते. या बदलांमध्ये खालील्चा समावेश असू शकतो:
अधिक वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री
फार कमी वेळा लघवी होणे
लघवीला फेस किंवा बुडबुडे
लघवीत रक्त
लघवी करण्यास त्रास
लघवी करताना वेदना किंवा जळजळ
4.उच्च रक्तदाब: उच्च रकतदाब हे मूत्रपिंड आजाराचे लक्षण असू शकते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मूत्रपिंडांची महत्त्वाची भूमिका असते आणि जेव्हा ते नीट काम करत नाही तेव्हा रक्तदाब वाढू शकतो.
5.मळमळ आणि उलटी: शरीरात जेव्हा टाकाऊ पदार्थ जमा होऊ लागता तेव्हा मळमळ आणि उलट्या होतात आणि मळमळण्याची भावना निर्माण होते.
6.खाज: शरीरात जेव्हा जास्तीचे टाकाऊ पदार्थ तयार होतात तेव्हा काज सुटू शकते आणि त्वचेचा क्षोभ होतो.
7.श्वास कमी पडणे: मूत्रपिंड रोगामुळे जेव्हा फुफ्फुसात द्रव जमा होते तेव्हा श्वास कमी पडतोय असे वाटू शकते.
8.कमी भूक: कमी भूक हे मूत्रपिंड आजाराचे लक्षण असू शकते. असे होण्याचे कारण म्हणजे टाकाऊ पदार्थ शरीरात जमा होऊ शकतात आणि त्यामुळे मळमळ किंवा भूक न लागण्याची भावना निर्माण होते.
9.स्नायूंमध्ये गोळा येणे: मूत्रपिंड आजारामुळे जेव्हा शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडते तेव्हा स्नायूंमध्ये गोळे येऊ शकतात.
10.लक्ष केंद्रित करण्यास त्रास: शरीरात जेव्हा टाकाऊ पदार्थ जमा व्हायला लागतात आणि त्यामुळे थकवा किंवा गोंधळाची भावना निर्माण होते तेव्हा लक्ष केंद्रित करण्यास त्रास होऊ शकतो.
मूत्रपिंड आजार ही गंभीर स्थिती आहे आणि उपचार न केल्यास अनेक क्लिष्टता निर्माण होऊ शकतात. लवकर कळणे किंवा निदान होणे ही यशस्वी उपचार आणि व्यवस्थापनाची गुरूकिल्ली आहे. वरील यादीतील कोणत्याही लक्षणांचा अनुभव तुम्हाला आला तर तुमच्या डॉक्टरांशी बोलणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला मूत्रपिंड रोग आहे का हे निश्चित करण्यासाठी तुमचे डॉक्टर काही तपासण्या करुन घेऊ शकतात आणि तुम्हाला योग्य उपचार पर्यायांची शिफारस करू शकतात. परिपूर्ण आहार, सतत पाणी पिणे आणि दीर्घकालिक परिस्थितीचे व्यवस्थापन करणे अशी मूत्रपिंड आरोग्य राखण्यासाठी पावले उचलली तर मूत्रपिंड आजार आणि त्याच्या क्लिष्टता टाळण्यास मदत होऊ शकते.
(लेखक नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर आहेत)