Fatty liver disease : लिव्हरमध्ये फार जास्त फॅट जमा झाल्याने फॅटी लिव्हर ही समस्या होते. लिव्हर आपल्या शरीरातील एक महत्वाचं अवयव असतं, जे आपल्या रक्तात केमिकल्सचं प्रमाण संतुलित ठेवतं. लिव्हर पित्तही तयार करतं जे लिव्हरमधील खराब पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. त्याशिवाय लिव्हर आपल्यासाठी प्रोटीनचं निर्माण, आयर्न जमा करणे आणि पोषक तत्वांना उर्जेत बदलण्याचं काम करतं.
पण जेव्हा आपल्या लिव्हरमध्ये फॅटचं प्रमाण जास्त होतं तेव्हा याने लिव्हरचं सामान्य काम प्रभावित होतं. यामुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.
सामान्यपणे फॅटी लिव्हर समस्या दोन प्रकारची असते. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या जास्त प्रमाणात दारूचं सेवन केल्याने होते. तर नॉ अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ही समस्या अशा लोकांना होते जे दारूचं सेवन अजिबात करत नाही किंवा फार कमी प्रमाणात करतात. दोन्ही स्थितींमध्ये लिव्हर सिरोसिसच्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो. जी लिव्हर डॅमेजची अॅडव्हांस स्टेज असते.
काय आहे लिव्हर सिरोसिस?
सिरोसिस, लिव्हर कॅन्सरनंतर सगळ्यात गंभीर आजार आहे. लिव्हर सिरोसिस झाल्यावर लिव्हरच्या कोशिका नष्ट होतात आणि त्याजागी फायबरयुक्त उतकांचा निर्माण होतो.
एखाद्या आजारामुळे किंवा दारू प्यायल्याने जेव्हा तुमचं लिव्हर खराब होतं तेव्हा त्या स्थितीत लिव्हर स्वत:त दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करतं. यादरम्यान स्कार टिशू तयार होऊ लागतात.
जसजसा सिरोसिस वाढतो, स्कार टिशू जास्तीत जास्त प्रमाणात तयार होऊ लागतात. ज्यामुळे लिव्हरला काम करण्यात अडचण येऊ शकते. सिरोसिसची समस्या जास्त वाढल्यावर याला अॅडव्हांस सिरोसिस म्हटलं जातं. ज्यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो.
लिव्हर सिरोसिसची लक्षणे आणि कारणे
लिव्हर सिरोसिस झाल्यावर याची कोणतेही लक्षणे आणि कारणे दिसत नाही. सामान्यपणे याचे संकेत तेव्हा दिसतात जेव्हा ही समस्या खूप जास्त वाढलेली असते.
थकवा
हलकी जखम झाली तर जास्त रक्त येणे
भूक न लागणे
उलटी
पाय, टाचांवर सूज सूज येणे
वजन कमी होणे
त्वचेवर खाज येणे
त्वचा आणि डोळे पिवळे दिसणे
पोटात फ्लूइड तयार होणे
त्वचेवर रक्त कोशिकांसारखं जाळं तयार होणे
हात लाल होणे
मासिक पाळी अचानक थांबणे
पुरूषांमध्ये लैंगिक इच्छा कमी होणे
काय करावे?
जर तुम्हाला वरीलपैकी कोणतेही संकेत दिसले तर लगेच डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करा. दरम्यान काही लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या का होते याचं कारण शोधणं फार अवघड आहे. तरीही काही संकेत आहेत.
लठ्ठपणा
टाइप 2 डायबिटीस
अंडर अॅक्टिव थायरॉइड
इन्सुलिन रेजिस्टेंस
हाय ब्लड प्रेशर
मेटाबॉलिक सिंड्रोम
स्मोकिंग
कसा कमी करावा फॅटी लिव्हर आजाराचा धोका
फॅटी लिव्हर आजाराचा धोका कमी करण्यासाठी हेल्दी प्लांट बेस्ड डाएट जसे की फळं, भाज्या, कडधान्य आणि हेल्दी फॅट्स घ्या.
वजन कंट्रोलमध्ये ठेवा. जर तुमचं वजन जास्त असेल किंवा तुम्हाला लठ्ठपणाची समस्या असेल तर कॅलरी इनटेक घटवा आणि रोज एक्सरसाइज करा.
जर तुमचं वजन हेल्दी असेल, ते हेल्दी डाएट आणि एक्सरसाइजने मेंटेन ठेवा. सोबतच एक्सरसाइज रोज करावी.