Fatty liver disease: पुरेशी झोप घेणं आरोग्यासाठी फार गरजेचं असतं. एक्सपर्ट सात ते आठ तासांची झोप घेण्यास सांगतात. तशी तर दुपारी झोपण्याची सवय आरोग्यासाठी नुकसानकारक मानली जाते. पण आजच्या काळात अनेक असे लोकही आहेत जे रात्री पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत त्यामुळे ते दुपारी झोपतात. जे लोक दुपारी दुपारी थोडा वेळ झोपतात, त्यांना फॅटी लिव्हर आजाराचा धोका वाढू शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे.
नव्या रिसर्चमधून इशारा देण्यात आला आहे की, जर कुणी दिवसा झोपत असेल किंवा पॉवरनॅफ घेत असेल तर त्यांना फॅटी लिव्हरचा धोका होऊ शकतो. जे लोक दिवसा 30 मिनिटांपेक्षा जास्त झोपतात, रात्री उशीरा झोपतात आणि घोरतात, त्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते. याने क्रॉनिक डिजीजचा धोकाही वाढतो.
वैज्ञानिकांना असंही आढळलं की, दिवसा झोपणाऱ्या लोकांना सिरोसिसची समस्याही होऊ शकते. यासाठी वैज्ञानिकांनी अशा चीनी लोकांवर रिसर्च केला ज्यांची लाइफस्टाईल बरोबर नव्हती आणि ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या होती.
वैज्ञानिकांना आढळलं की, झोपेची क्वालिटी किंवा झोपेच्या कमतरतेमुळे फॅटी लिव्हरसहती अनेक आजारांचा धोका वाढू लागतो. झोपेच्या खराब क्वालिटीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हेही आढळून आलं की, लठ्ठ लोकांना खराब झोप किंवा दिवसा झोप घेणं अधिक नुकसानकारक होऊ शकतं.
एक्सपर्टनुसार, झोपेची क्वालिटी सुधारल्याने पुरूषांमध्ये आजारांचा धोका कमी होऊ शकतो. रिसर्चचे लेखक डॉ. यान लियू यांनी सांगितलं की, 'आमच्या रिसर्चमध्ये आढळून आलं की, झोपेच्या क्वालिटीमध्ये सुधारणा केली तर फॅटी लिव्हरचा धोका 29 टक्के कमी केला जाऊ शकतो'.
चीनच्या ग्वांगझूमध्ये सन यात-सेन यूनिव्हर्सिटीतील अभ्यासकांनी सांगितलं की, 'आमच्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं की, झोपेच्या क्वालिटीमध्ये थोडी सुधारणा केली तरी अनहेल्दी लाइफस्टाईल असलेल्या लोकांना फॅटी लिव्हरचा धोका कमी करण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे झोपेची क्वालिटी चांगली करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून या आजारापासून बचाव होईल.
वैज्ञानिक म्हणाले की, लिव्हरचं आपलं एक टायमिंग असतं. जर तुम्ही त्याला त्याचं काम करण्यास कशाप्रकारेही रोखाल किंवा अडथळा निर्माण कराल तर अर्थातच लिव्हरचं नुकसान होईल. झोपेच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिज्म आणि फॅटचं प्रमाण बदलतं. जर कुणी एक रात्रही झोपलं नाही तर लिव्हर ग्लूकोजचं उप्तादन करण्याची क्षमता गमावतो. याने फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
सिरोसिस काय आहे?
सिरोसिस एक असा आजार आहे जो लिव्हरच्या कॅन्सरनंतर सर्वाधिक होतो. जर बऱ्याच काळापासून लिव्हरला नुकसान होत असेल तर लिव्हर सिरोसिस स्थितीत पोहोचतं. या स्थितीची लक्षणे सुरूवातीला दिसून येत नाहीत. पण हळूहळून नंतर दिसतात. नंतर दिसणाऱ्या लक्षणांमध्ये थकवा जाणवणे, पिवळी त्वचा, डोळे-त्वचेवर खाज आणि पोटावर सूज यांचा समावेश आहे.