Fatty Liver Remedies: फॅटी लिव्हर आजार झाल्यावर लिव्हरमध्ये जास्त प्रमाणात फॅट जमा होऊ लागतं. लिव्हरमध्ये फॅट जमा होण्याची अनेक कारणे आहेत. ही समस्या फार जास्त प्रमाणात मद्यसेवन केल्यानेही होते आणि अनहेल्दी लाइफस्टाईलमुळेही होते. फॅटी लिव्हर आजार झाल्यावर याचे सुरूवातीचे संकेत ओळखणं फार अवघड असतं. पण जर तुम्हाला जास्त थकवा, वजन कमी होणे सोबत पोटदुखीची समस्या झाली असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
फॅटी लिव्हर आजारावर वेळीच उपचार घेतले नाही तर याने डायबिटीस, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अशात तुम्हालाही फॅटी लिव्हर आजार झाला असेल आम्ही काही कॉमन उपाय सांगत आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही या आजारापासून बचाव करू शकता.
फास्टिंग - इलिनोइस विश्वविद्यालयातील अभ्यासकांचं मत आहे की, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा आजार झाल्यावर तुम्ही दर दुसऱ्या दिवशी फास्टिंगसोबत आठवड्यातून 5 दिवस एक्सरसाइज केली पाहिजे. अभ्यासकांनी सांगितलं की, आम्ही नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा आजार असलेल्या 80 रूग्णांचा अभ्यास केला. यातून समोर आलं की, हेल्दी डाएटसोबत रोज एक्सरसाइज केल्याने आणि दर दुसऱ्या दिवशी फास्टिंग केल्याने ही समस्या दूर करता येते.
इंटेंस एरोबिक्स - पेंसिल्वेनिया स्टेट यूनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिन, हर्शे, पेंसिल्वेनिया, यूएसएच्या शोधकर्त्यांना एका रिसर्चमध्ये आढळलं की, जर आठवड्यात 150 मिनिटे इंटेंस एरोबिक्स केल्यावर फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. हा रिसर्च अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजीमध्ये प्रकाशित केला होता.
मेडिटेरेनियन डाएट - एका रिसर्चमधून असं समोर आलं की, मेडिटेरेनियन डाएट फॉलो केल्याने फॅटी लिव्हरची समस्या दूर करू शकता. मेडिटेरेनियन डाएट एका प्लांट बेस्ड डाएट असते. याचा अर्थ ही डाएट फॉलो करताना फळं आणि भाज्यांवर जास्त फोकस करावा लागतो. या डाएटमध्ये वेगवेगळी फळ, भाज्या, कडधान्य, नट्स आणि सीड्सचा समावेश केला जातो.
फॅटी लिव्हरचा धोका - जर तुम्हाला फॅटी लिव्हर समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर आधी तुम्हाला रिस्क फॅक्टर्सबाबत जाणून घेणं गरजेचं आहे. लठ्ठपणा, स्लीप एपनिया, ट्राइग्लिसराइड्सचं प्रमाण हाय, हायपोथायरॉडिज्म आणि डायबिटीसमुळे फॅटी लिव्हरची समस्या जास्त वाढू लागते. अनेकदा काही औषधांमुळेही लिव्हरमध्ये फॅट जमा होऊ लागतं.
फॅटी लिव्हरच्या समस्येपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही हेल्दी डाएटसोबत हेल्दी वेटही मेंटेन ठेवा आणि रोज एक्सरसाइज करा. त्यासोबतच फॅटी लिव्हरचे धोके समजून घेणंही गरजेचं आहे. जेणेकरून योग्य उपचार घेता येतील. वजन कमी केल्याने लिव्हरमध्ये जमा होत असलेलं फॅट, सूज आणि फाइब्रोसिस कमी केलं जाऊ शकतं.