आंतरराष्ट्रीय स्तरावर नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, वयस्कांना कोविड-१९ च वॅक्सीन (Corona Vaccine) लावण्यासाठी जर चुकीची इंजेक्शन टेक्नीक वापरली गेली तर वॅक्सीनेशननंतर रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात. जर्मनीच्या म्यूनिख यूनिव्हर्सिटी आणि इटलीच्या एका इन्स्टिट्यूटच्या संयुक्त क्लिनिकल ट्रायलमध्ये ही बाब समोर आली आहे.
आरोग्य तज्ज्ञ म्हणाले की, जर इंजेक्शन देण्याची पद्धत चुकीची असेल तर वॅक्सीन मांसपेशीमध्ये इंजेक्ट होण्याऐवजी रक्त प्रवाहात इंजेक्ट होऊ शकते. जर असं झालं तर रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता जास्त होती. केरळच्या कोच्चिमध्ये कोविड-१९ (Corona Virus) महामारीसोबत लढण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राजीव जयदेवन यांचंही हेच मत आहे.
त्यांचं मत आहे की, जर इंजेक्शनची नोक मांसपेशीमध्ये पुरेशी खोलात शिरत नसेल, किंवा रक्तवाहिनीशी भिडत असेल तर अशा स्थितीत ती ब्लड स्ट्रीममध्ये इंजेक्ट होऊ शकते. याची शक्यता तेव्हा कमी असते जेव्हा वॅक्सीन एखाद्या प्रशिक्षित हेल्थ वर्करकडून दिली जाते.
कोणत्या वॅक्सीननंतर ब्लड क्लॉटिंग?
डॉक्टर जयदेव म्हणाले की, जेव्हा असं होतं. तेव्हा वॅक्सीन योग्यपणे परिणाम साधत नाही आणि वॅक्सीन त्वचा व मांसपेशीच्या मधे चामड्याच्या थराखालून रक्त वाहिकांना हिट करू शकते. जॉन्सन अॅन्ड जॉन्सन आणि एजेड एडेनोव्हायरस वॅक्सीन घेतल्यानंतर जगभरात ब्लड क्लॉटिंगच्या केसे समोर आल्या होत्या.
जर्मनीच्या म्यूनिख यूनिव्हर्सिटी आणि इटलीच्या एका इन्स्टिट्यूटच्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, जर एडेनोव्हायरस वॅक्सीन जर ब्लड स्ट्रीमध्ये दिली जात असेल तर अशी समस्या समोर येऊ शकते. हा रिसर्च एस्ट्राजेनेका आणि फायजरसारख्या वॅक्सीन घेणाऱ्या लोकांवरही करण्यात आला होता. त्यांना वेगळ्या पद्धतीने वॅक्सीनेट करण्यात आलं होतं.
कुणाला जास्त धोका?
आतापर्यंत समोर आलेल्या रिसर्चनुसार, क्लॉटिंगच्या केसेस महिलांमध्ये जास्त बघायला मिळाल्या आहेत. याचं काऱण अजून समजू शकलेलं नाही. डॉक्टर राजीव यांना हाच प्रश्न विचारण्यात आला तर ते म्हणाले की, महिलांच्या शरीरात डेल्टोइड मांसपेशी सघन असते.
याचा अर्थ हा आहे की, त्यांच्यात चरबीचा सघन थर पुरूषांच्या तुलनेत कमी असतो. याचा अर्थ हा आहे की, मांसापर्यंत पोहोचण्यासाठी वॅक्सीन महिलांना योग्य प्रकारे लावावी. सामान्यपणे महिला आणि पुरूषांना सेम लेंथ असलेली निडल वापरली जाते. असात मांसपेशीपर्यंत निडल न पोहोचणं, हे महिलांमद्ये जास्त होऊ शकतं