ताणतणाव, कमी झोप आणि सतत स्क्रीनसमोर असणे यामुळे साहजिकच शरिरावावर याचे परिणाम दिसतात. यापैकी अनेक जणांमध्ये दिसणारी एक सामान्य समस्या म्हणजे डोळ्यांखाली येणारे काळे वर्तुळ. बदलत्या जीवनशैलीमुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. अनेकवेळा मेकअपमुळे या गोष्टी झाकल्या जातात. काही घरगुती उपायांनी डार्क सर्कल्स घालवता येतील. हे डार्क सर्कल्स येण्यामागे मूळ कारणे कोणती आणि यावर उपाय काय बघुया
सतत स्क्रीनसमोर असणे
मोबाईलचा वापर फार वाढला आहे. त्यात आता कामे सुद्धा लॅपटॉपच्या स्क्रीनवरच होतात. त्यामुळे साहजिकच डोळ्यांवर ताण येतो. तणावामुळे झोप अपुरी होते. हेच कारण आहे की डोळ्यांखाली डार्क सर्कल्स दिसतात.
तणाव, टेंन्शन
तुम्ही सतत कुठल्यातरी टेन्शनमध्ये असाल तर शरीरावरही परिणाम होतो. वाढते स्ट्रेस गंभीर विषय बनत चालला आहे.
हार्मोन्सचे असंतुलन
हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांचा परिणाम अशाप्रकारे दिसून येऊ शकतो. त्वचा काळवंडते, डार्क सर्कल्स होतात.
पाणी कमी पिणे
रोज मुबलक पाणी प्यायले नाही तर शरिर निरोगी राहत नाही. चेहरा निस्तेज दिसू लागतो. याचा परिणाम डार्क सर्कल्स येतात.
डार्क सर्कल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय कोणते ?
काकडी
काळे वर्तुळ कमी करण्यासाठी थंड काकडीचा उपयोग होऊ शकतो. काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवा याने चेहऱ्याला आराम मिळतो. तसेच काकडी उष्णता शोषून घेते यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात.
ग्रीन टी बॅग
ग्रीन टी हा सुद्धा डार्क सर्कल्सवर गुणकारी उपाय आहे. ग्रीन टी मध्ये अॅंटीऑक्सिडेंट्स असतात मात्र याचा डोळ्यांसाठी कसा उपयेग होईल , तर ग्रीन टी बॅग फ्रीजमध्ये ठेवा थंड झाल्यावर बाहेर काढा. ही बॅग १५ मिनिटे डोळ्यांवर ठेवा फरक जाणवेल.
टोमॅटो
टोमॅटोचा रस उष्णता शोषून घेतो. त्यात १ चमचा लिंबू टाका. कापसावर हा तर घेऊन डोळ्यांच्या खाली लावा. याने काळपटपणा हळूहळू जाईल.
गुलाबपाणी
गुलाबपाणी बऱ्याचदा डोळ्यांना लावण्याचा सल्ला दिला जातो. रोज सकाळी कापसाने गुलाबपाणी डोळ्याखाली लावल्यास डार्क सर्कल्स नक्कीच कमी होतील.