(Image Credit : cozywinters.com)
हिवाळ्यात सगळ्यांना थंडी वाजते. पण जर ही थंडी तुमच्या शरीरावर अधिक प्रभाव करत असेल किंवा नेहमीची कामे करणंही अवघड होत असेल तर ही बाब सामान्य नाही. जसे की, पाण्यात जास्त वेळ काम केलं नाही किंवा तापही नाही तरी सुद्धा थंडीने तुमची हालत खराब होत असेल तर ही बाब गंभीर आहे. म्हणजे तुम्हाला इतरांपेक्षा अधिक थंडी जाणवत असेल तर तुमचं आरोग्य चांगलं नाही, असे संकेत मिळतात. अशात याची कारणे काय असतात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं.
झोप पूर्ण न होणे
कोणत्याही कारणाने जर तुम्ही ७ ते ८ तास झोप घेऊ शकत नसाल तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजू शकते. याचं कारण शरीराला प्रॉपर आराम न मिळणे. जर शरीराला आवश्यक तो आराम मिळाला नाही तर शरीराचं तापमान मेंटेन राहत नाही. तसेच झोप पूर्ण झाली नाही तर मेटाबॉलिज्म स्लो काम करू लागतं. याने शरीरात ऊर्जा कमी निर्माण होते आणि अधिक थंडी वाजते.
ब्लड सर्कुलेशन कमी होणं
शरीरात योग्य प्रकारे ब्लड सर्कुलेशन होऊ न शकल्यानेही थंडी जास्त वाजू शकते. ही स्थिती सामान्यपणे डायबिटीस किंवा हृदयरोगाच्या रूग्णांमध्ये बघायला मिळते. त्यासोबतच मसल्सची समस्या, सांधेदुखी किंवा पोटात क्रॅम्पसोबत वेदना होत असतील तर थंडी जास्त जाणवते. याचं कारणही शरीरात ब्लड सर्कुलेशन योग्यप्रकारे न होणे हेच आहे.
शरीरात रक्ताची कमतरता
फार जास्त डायटिंग केल्याने किंवा फास्ट फूडवर जास्त अवलंबून राहिल्याने शरीराल आवश्यक तेवढं पोषण मिळत नाही. यामुळे जास्तीत जास्त लहान मुले किंवा टीनएजर्स प्रॉपर न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे एनिमियाचे शिकार होतात. ही स्थिती सामान्यपणे मुलींमध्ये अधिक बघायला मिळते. शरीरात रक्ताची कमतरता असल्याने काही लोकांना अधिक थंडी वाजते.
वजन कमी असणं
ज्या लोकांचं वजन, त्यांची उंची वयानुसार नसते त्या लोकांनाही अधिक थंडी जाणवते. याचं कारण फार सडपातळ लोकांमध्ये किंवा जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांच्या शरीरात स्टोर्ड फॅट प्रमाण कमी असतं. ज्याच्या वापर शरीरात एनर्जी आणि हीट जनरेट करण्यासाठी केला जातो. हे फॅट नसल्याने शरीर गरजेनुसार हीट निर्माण करू शकत नाही आणि त्यामुळे जास्त थंडी जाणवते.
हायपोथाइरॉइडिज्म
शरीरात हार्मोन्सचं असंतुलन होण्यासाठी हायपोथायरॉयडिज्मची स्थिती असते. ही एक हार्मोनल डिसऑर्डरची स्थिती आहे. या स्थितीत शरीरात आवश्यक तेवढ्या हार्मोन्सची निर्मिती होत नाही. त्यामुळे मेटाबॉलिज्म शरीराचं तापमान मेंटेन ठेवू शकत नाही आणि यामुळे थंडी अधिक जाणवते.