उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर असलेल्या उष्ण वातावरणामुळे अनेकजण बाहेर जाणे टाळतात. त्यामुळे शरीराचा व्यायाम कमी होतो. तसेच या जोडीला फास्ट फुड व जंक फुडचं सेवन पोटावरील चरबी पर्यायाने वजन वाढते. हे नियंत्रित ठेवणे शक्य आहे. त्यासाठी एक साधा सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही वर्कआऊट केल्याशिवाय वजन कमी करण्याचे प्रयत्न करत असाल तर बडीशेपाचे पाणी तुमच्यासाठी वरदान ठरेल. बडीशेपाच्या पाण्याचे वजन कमी करण्याशिवाय आणखीही फायदे असतात. कोणते? घेऊया जाणून...
वजन कमी करण्यास उपयुक्तबडीशेपाच्या पाण्यामुळे वजन कमालीचे कमी होते. कारण बडीशेपाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असते. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर बडीशेपाचे पाणी प्या. यामुळे तुमचे शरीर एकदम तंदरुस्त राहील आणि तुम्हाला कोणते आजरही शिवणार नाहीत.
प्रतिकारशक्ती वाढवतेप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बडीशेपाच्या पाण्याचा फार फायदा होतो. कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी कोरोना पुर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे प्रतिकारशक्तीवर लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढेल व संसर्गाचा धोका कमी होईल.
डायबिटीसमध्ये अत्यंत फायद्याचेडायबिटीसच्या रुग्णांसाठी बडीशेपाचे पाणी म्हणजे अमृत. सकाळी याचे सेवन केल्याने रक्तातील शुगर आणि इन्शुलिन नियंत्रित राहते.
बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करतेजर तुम्ही बडीशेपाचे पाणी प्यालयात तर तुमच्या शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉल कमी होते. तुम्ही जास्त तेलकट तुपकट खात असाल तर तुमच्या शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉल वाढतं व त्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका निर्माण होतो. बडीशेपाच्या पाण्यामुळे हा धोका कमी होतो.
कसे तयार करावे बडीशेपाचे पाणी?यासाठी बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी व सकाळी ती पाण्यात कुस्करुन ते पाणी गाळून प्यावे.