Fenugreek Seeds For Lowering Bad Cholesterol: नसांमध्ये वाढत असलेलं कोलेस्ट्रॉल कोणत्याही क्षणी जीवघेणं ठरू शकतं. कारण याने हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डायबिटीज, हार्ट फेलियर आणि ट्रिपल वेसल डिजीजचा धोका वाढतो. अनेक हेल्थ एक्सपर्ट कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगतात असतात. जे फायदेशीरही असतात. असाच एक सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे मेथीचे दाणे. जे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जातात. यांनी नसांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं.
मेथीच्या बियांचे फायदे
- मेथीच्या पिवळ्या दाण्यांबाबत ग्रेटर नोएडाच्या GIMS हॉस्पिटलमध्ये कार्यरत फेमस डयटीशियन आयुषी यादव (Ayushi Yadav) यांनी सांगितलं की, मेथीचं सेवन कसं करावं आणि त्याचे शरीराला कोणकोणते फायदे होतात.
- मेथीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि इतरही काही व्हिटॅमिन असतात. तसेच यात भरपूर फायबर, कॅल्शिअम, फोलिक अॅसिड, कॉपर आणि पोटॅशिअम असतं.
- मेथीच्या दाण्यांमध्ये असे कंपाउंड आढळतात जे लिव्हरच्या माध्यमातून कोलेस्ट्रॉलचं एक्ट्रा प्रोडक्शन रोखण्यास मदत करतं. याने आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं एब्जॉर्ब्शन कमी होतं.
- मेथीच्या दाण्यांमध्ये आढळणारं स्टेरॉयडल सॅपोनिन हे आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं. या बियांमुळे नसांमध्ये गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.
- अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, मेथीचे दाणे लिव्हरमध्ये असलेल्या एलडीएल रिसेप्टर्सना बूस्ट करण्यास मदत करतात. सोबतच याने लिपिड प्रोफाइलमध्येही सुधारणा होते.
कसं करावं मेथीच्या दाण्यांचं सेवन?
आयुषी यादव यांच्यानुसार, फेनुग्रीक सीड्स म्हणजेच मेथीच्या बियांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी याचं सेवन सकाळी रिकाम्या पोटी करावं. तुम्ही रात्रीच्या वेळी एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर हे पाणी प्या आणि दाणे चावून खा.