शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

मार्चच्या पहिल्या दिवशी जाणून घ्या एका निरोगी व्यक्तीने किती प्यावं पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 11:29 AM

मार्च महिन्याला सुरूवात होण्यासोबतच वातावरणातही उकाडा जाणवू लागतो. या वातावरण बदलामध्ये योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

(Image Credit : Yoga Journal)

मार्च महिन्याला सुरूवात होण्यासोबतच वातावरणातही उकाडा जाणवू लागतो. या वातावरण बदलामध्ये योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यात सर्वात जास्त महत्त्वाचं आहे ते शरीराला हायड्रेट ठेवणे. थंडीमध्ये तसे सगळेच लोक तहान कमी लागत असल्याने कमी पाणी पितात. पण वातावरणातील गरमी वाढल्याने पाणी अधिक पिणे गरजेचं असतं. चला जाणून घेऊ एका व्यक्तीने किती पाणी पिणं गरजेचं असतं. 

लाइफ लाइन आहे पाणी

चांगला आहार आणि स्वच्छ हवेसोबतच शरीरासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. शुद्ध, स्वच्छ पाणी हे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया योग्यरितीने सूरू राहण्यासाठी गरजेचं असतं. पाण्याने केवळ आपली तहानच भागते असं नाही तर हे संपूर्ण शरीरासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे की, आपल्याला कधी आणि किती पाणी प्यायला हवे. 

सकाळी उठल्यावर

सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिणे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. झोपेतून उठल्यावर एक ग्लास साधं पाणी किंवा कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांना फायदा होतो. याने शरीराच विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते. तसेच रात्रभर पाण्याचं कमी झालेलं प्रमाणही याने नियंत्रित होतं. 

जेवणाआधी किती?

जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल. याचा अर्थ तुम्हाला जेवण कमी करण्याची शक्यता राहणार नाही. जेव्हा तुम्ही हायड्रेट असता तेव्हा पोटही जेवणासाठी तयार झालेलं असतं. पाणी चवीच्या पेशींना जागं करतो आणि पोटालाही मॉइश्चराइज करतो. एक ग्लास पाणी प्यायल्याने जेवताना तुम्हाला फार पाणी पिण्याची गरज पडणार नाही. 

वर्कआउटच्या पूर्वी

तापमान आणि तुमच्या शरीरातील द्रव्य स्तराच्या आधारावर तुम्हाला वर्कआउट दरम्यान आणि नंतर डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी एक ग्लास पाणी पिण्याची गरज असते. याने तुमचा स्ट्रोकच्या समस्येपासूनही बचाव होऊ शकतो. 

वर्कआउटनंतर

वर्कआउटनंतर तुम्हाला घाम आणि लघवीच्या माध्यमातून खर्ची केलेल्या तरल पदार्थांची गरज असते. त्यासाठी तुम्हाला पाणी पिणे गरजेचं असतं. तुम्ही कोणत्याही वातावरणात व्यायाम करा, पण पाणी आवर्जून प्यावं.

बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यावर

जर तुम्ही आजारी लोकांच्या संपर्कात असाल तर वायरस आणि बॅक्टेरिया दूर ठेवण्यासाठी तुम्हाला सामान्यापेक्षा थोडं जास्त पाणी प्यावं लागेल. याने शरीर बॅक्टेरिया मुक्त होईल. याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. 

आजारी असताना

जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताप असतो, कफ किंवा सर्दीची समस्या असते तेव्हा शरीरात पाणी कमी होतं. याने तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. अनेक तज्ज्ञ सांगतात की, अशा स्थितीत जर भरपूर पाणी सेवन केलं तर आजार लवकर दूर पळतो. 

थकलेले असताना

थकवा हा डिहायड्रेशनच्या लक्षणांपैकी एक असल्याचं तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते तेव्हा थकवा जाणवतो. तुम्हाला ऑफिसमध्ये काम करताना थकवा जाणवत असेल तर एक ग्लास पाणी घ्या, तुमचा थकवा दूर होईल.  

टॅग्स :WaterपाणीHealth Tipsहेल्थ टिप्स