सुरक्षित रक्त जळगावात प्रथमच गोळवलकर ब्लड बँकेत २७ पासून सुविधा
By admin | Published: January 26, 2016 12:04 AM
जळगाव- जगातील सर्वात सुरक्षित व नॅट तंत्रज्ञानाने तपासलेले रक्त नागपूर व्यतिरिक्त विदर्भ व खान्देशात प्रथमच माधवराव गोळवलकर ब्लड बँकेत दि.२७ जानेवारीपासून उपलब्ध होत आहे. अशी माहिती प्रकल्प प्रमुख व ज्येष्ठ रक्तरोग तज्ज्ञ डॉ.विवेकानंद कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी दि.१ जानेवारीपासून नवीन जागेत चित्रा चौक, जे.एम.पी. मार्केट, कोंबडीबाजाराजवळ येथे स्थलांतरित झाले आहे. या जागेचे औपचारिक उद्घाटन व नॅट तंत्रज्ञानाने तपासलेले रक्त वितरण प्रारंभ या कार्यक्रमास आयोजन २७ जानेवारी सायंकाळी ५.३० वा. केले जाणार आहे. उद्घाटन सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सुदर्शन नवाल यांच्याहस्ते होणार आहे.