शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

​हिवाळ्यात असे रहा फिट...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2016 8:10 PM

हिवाळा सुरु होताच त्याचा परिणाम आपली त्वचा, शरीर आणि शारीरिक प्रक्रियांवर जाणवायला लागतो. हिवाळ्यात भूक वाढते आणि शारीरिक कष्ट काहीअंशी कमी होतात.....

-Ravindra Moreहिवाळा सुरु होताच त्याचा परिणाम आपली त्वचा, शरीर आणि शारीरिक प्रक्रियांवर जाणवायला लागतो. हिवाळ्यात भूक वाढते आणि शारीरिक कष्ट काहीअंशी कमी होतात, मात्र लहान-सहान गोष्टींसोबत सकाळची सुरुवात केली तर हिवाळ्यात आपण सृदृढ तर राहणारच शिवाय आपल्या सौंदर्यातदेखील भर पडेल. आजच्या सदरात आपण हिवाळ्यात फिट राहण्यासाठी काय काळजी घ्याल याबाबत जाणून घेऊयात... * अंथरुण सोडल्यानंतर लगेच व्यायाम करा-अंथरुणावरुन उठल्यानंतर आपल्या शरीरास ताण द्या आणि नंतर ढिले सोडा. पुन्हा ताणा आणि ढिले सोडा. चार ते पाच वेळा ही क्रिया करा. असे केल्याने शरीराचे तापमान वाढेल. जर आपल्याकडे वेळ असेल तर एका ठिकाणी उभे राहून काही वेळ जॉगिंग करा. असे केल्याने शरीरात स्फूर्ती येईल आणि आपले पुढची कामे लवकर होतील. * उटण्याने स्रान करा-हिवाळ्यात स्रान करताना साबणाचा वापर कमी करा, त्याऐवजी चांगल्या प्रतीचे उटणे लावा. हात, पाय, पाठ, गुडघे तसेच मान उटण्याने चांगले चोळून स्रान करा व त्यानंतर टॉवेलने अंग पुसा. याप्रकारच्या स्रानाने ताजेतवाने तर वाटेलच शिवाय स्फूर्ती आणि उष्णतादेखील मिळेल.* पोट भरुन खाहिवाळ्यात भूक अधिक लागते आणि रिकाम्या पोटी थंडी जास्त वाजते. यासाठी सकाळी पौष्टिक नास्ता भरपूर खा. तसेच जेवणात भरपूर ऊर्जा प्रदान करणारे खाद्यपदार्थ घ्या. गरमागरम सूप घेणेदेखील या ऋतूत आरोग्यासाठी फायदेशीर असते. * गरम कपडे परिधान करा-ऋतुमानानुसार कपड्यांची निवड करा. त्यात जाड व जड कपड्यांऐवजी बारीक पण गरम कपडे घ्या. यामुळे आपला नक्कीच थंडीपासून बचाव होईल. तसेच इनरवेअर कॉटनचे असतील तर उत्तमच. दस्ताने आणि मोजे परिधान करण्यात संकोच नको. यामुळे आपणास आराम तर मिळेलच शिवाय त्वचेचेही संरक्षण होईल. * पायी चला-  जर आपले कार्यालय आपल्या घरापासून जास्त लांब नसेल तर कार्यालयापर्यंत पायी जा. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया वाढेल, ज्यामुळे आपणास थंडी जास्त जाणवणार नाही. या ऋतूत लिफ्टचा प्रयोग कमी करा. दिवसातून दोन ते तीनदा पायºयांचा वापर करा. यामुळे शरीराचा व्यायाम तर होईल शिवाय शरीरास ऊर्जादेखील मिळेल. जर आपले काम पायी चालण्याचे जास्त नसेल तर घरात जेव्हाही वेळ मिळेल वेगाने काही वेळ चाला. चालल्याने शरीरास गरमी मिळते. * ओठ व पायांची काळजी घ्या-या ऋतूत पायाच्या टाचा आणि ओठांना तडे पडतात. यासाठी पायांची मालिश करुन थंडीपासून बचाव करावा. घरात स्लीपरसोबतच मोजे परिधान करा. तसेच ओठांवर व्हॅसलीन व लिपस्टिक लावत रहा, यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत.  * घराचे तापमान संतुलित ठेवा-घराचे तापमान संतुलित ठेवा. जास्त उष्ण किंवा जास्त वातानुकूलित रुममध्ये झोपू नये. यामुळे थंडीपासून तर बचाव होईल मात्र, सकाळी उठल्यावर आपल्याला फ्रेश तर वाटणार नाही शिवाय सुस्ती अधिक वाटेल. * मॉयश्चरायजरला अधिक महत्त्व द्या-या काळात गार हवा आणि दुपारचे उष्ण तापमान याचा त्वचेवर परिणाम होतो. यासाठी कोल्ड क्रीमसोबतच मॉयश्चरायजरचा प्रयोग करा. त्वचेची मुलायमता कायम ठेवण्यासाठी पेट्रोलियम, लेनोलिन, मिनरल आॅइल, ग्लिसरीन आदीचा देखील प्रयोग करा. यातील मुलायम ठेवणाºया तत्वांमुळे त्वचेचे रक्षण होते.