शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

​Fitness : जीममध्ये जात असाल तर या ‘६’ गोष्टींचा संकोच नकोच !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2017 10:49 AM

संकुचित मनाने जर वर्कआउट केले तर आपले उद्दिष्टे सफल होणार नाही. यासाठी जीममध्ये जाताना या सहा गोष्टींचा संकोच अजिबात नकोच.

आपलीही बॉडी सेलिब्रिटीसारखी फिट असावी असे आजच्या तरुणांना वाटते, यासाठी ते जीमदेखील जॉइन करतात. मात्र जेव्हा एखाद्या मोठ्या व नामांकीत जीममध्ये प्रथमच जातात तेव्हा तिथे त्यांना संकोचल्यासारखे वाटते. अशा वातावरणामध्ये सुरुवातीला अवघडल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र असे संकुचित मनाने जर वर्कआउट केले तर आपले उद्दिष्टे सफल होणार नाही. यासाठी जीममध्ये जाताना या सहा गोष्टींचा संकोच अजिबात नकोच. * वजन जास्त असणेजर आपले वजन इतरांपेक्षा जास्त असेल तर संकोच वाटू देऊ नका. कदाचित त्यांचेही वजन जीम जॉइन करतेवेळी जास्त असेल आणि आता सततच्या व्यायामाने कमी झाले असेल. त्यामुळे जीममधील फीट व सडपातळ लोकांकडे पाहून स्वत:बद्दल लाज वाटून घेण्यापेक्षा त्यांच्याकडून प्रेरीत व्हा व व्यायामाला लागा.* मशिनबाबतचे ज्ञान  पहिल्यांदाच जीममध्ये जात असाल तर तुम्हाला प्रत्येक मशिनबाबत योग्य ज्ञान करुन घेणे गरजेचे आहे. कारण जर तुम्ही तज्ञांच्या मदतीशिवाय एखादे मशिन वापरले तर तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता असते.जीममधील इतर माणसे जलदगतीने सर्व मशिनवर वर्कआऊट करु शकतात कारण त्यांना काही महिन्यांपासून तिथे व्यायाम करण्याचा सराव असतो. तुम्हाला देखील तसे करणे नक्कीच जमेल पण त्यासाठी दोन आठवड्यांपासून तुम्ही ते शिकण्याचा जीममध्ये करीत असलेल्या प्रयत्न सोडून देऊ नका.* चांगले दिसणे काही महिला जीममध्ये मेक-अप करुन अथवा थोड्याफार अ‍ॅक्सेसरीज घालून जातात. तर काही जणी मेक-अप न करता देखील अतिशय आकर्षक दिसतात. पण यामुळे तुम्ही उदास होण्याची गरज नाही. कारण जसजसा तुम्ही व्यायाम करु लागाल तुमच्या चेहºयावर देखील ग्लो येईल. त्यामुळे फक्त स्वत:च्या वर्कआऊटवर लक्ष द्या. * कपड्यांची तुलना  जीममध्ये जाण्याचे आपले उद्दिष्ट वेगळे असते. तिथे कोणताही फॅशन परेड नसते, म्हणून ब्रॅन्डेड कपडे घालून तुमचे वजन कमी होणार नाही. जर तुमचे कपडे स्वच्छ व आरामदायक असतील तर तुम्हाला त्याबाबत संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण त्यामुळे इतरांच्या कपड्यांशी आपल्या कपड्यांची तुलना करीत बसण्यापेक्षा तुम्ही जे कपडे घातले आहेत त्यामध्ये मोकळेपणाने व आत्मविश्वासाने वावरा. * इतरांशी बोलणे जीममधील प्रत्येक व्यक्ती फ्रेन्डली असेल असे नाही. काही लोक चांगल्या स्वभावाचे असतील तर काही लोक शिष्ट स्वभावाचे असू शकतील. कोणी कोणत्याही स्वभावाचे असले तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. जर तिथे तुमच्याशी कोणी नीट बोलत नसेल तर ठिकच आहे. कारण तुम्ही तिथे मैत्री करण्यासाठी नक्कीच जाणार नाही आहात.* स्टॅमिना कमी वाटणे तिथल्या इतर लोकांचा स्टॅमिना तुमच्यापेक्षा जास्त असेल तर काहीच हरकत नाही. त्यासाठी स्वत:ला झटपट स्टॅमिना वाढविण्यासाठी पूश करु नका. तुमचा स्टॅमिना हळूहळू व दररोज व्यायाम करुन वाढू लागेल. तुमचे ट्रेनर त्यासाठी तुम्हाला मदत करतील. उगाचच दाखविण्यासाठी तुमचा क्षमता नसताना स्टॅमिना वाढवून दाखवू नका.