Fitness : या सोप्या पद्धतीने बनवा 3D शोल्डर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 6:46 AM
बॉडी बिल्डिंगसाठी प्रयत्न करणाऱ्यांना 3डी शोल्डरचा लुक हवा असतो. मात्र प्रयत्न करु नही मिळत नाही. या टिप्सच्या साह्याने आपण 3D शोल्डर्स बनवू शकता.
जर आपण बॉडी बिल्डिंगसाठी प्रयत्न करीत असाल तर आपणास 3D शोल्डरच्या बाबतीत माहित असेलच. राउंडेड आणि फुलर शोल्डरला 3D शोल्डर नावाने ओळखले जाते. बॉडी बिल्डिंगसाठी प्रयत्न करणाऱ्यांना 3D शोल्डरचा लुक हवा असतो. मात्र प्रयत्न करु नही मिळत नाही. आज आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपण 3D शोल्डर्स बनवू शकता. जर आपणास 3D शोल्डर हवे असतील तर आपणास लेटरल डेल्टॉएड्सची ट्रेनिंग घ्यावी लागते. लेटरल डेल्टॉएड्सला मीडियल डेल्टॉएड्सदेखील म्हटले जाते. लेटरल डेल्टॉएड्स, डेल्टॉएड्स ग्रुपचा आउटरमोस्ट हेड असतो, जो खांद्यांना राउंडेड आणि फुलर बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. हा खांद्याच्या वर आणि अॅँटीरियर तसेच पोस्टेरियर डेल्टोएडच्या मध्ये स्थिर असतो. * 3D शोल्डरची प्रक्रिया3D शोल्डर बनविण्यासाठी आपणास लेटरल डेल्टॉएड्सवर विशेष लक्ष द्यावे लागेल. लेटरल डेल्टॉएड्सच्या मदतीने आपले शोल्डर राउंडेड आणि फुलर शेपमध्ये येतात. जर आपणास शेपमध्ये बॉडी हवी असल्यास तर यासाठी आपले खांद्ये शरीरापासून थोडे दूर हवेत. याला साइड वेजदेखील म्हटले जाते. हे खांद्याच्या बाहेरील आणि आंतरिक रोटेशनमध्येही मदतगार ठरते. लेटरल डेल्टॉएड्सला मजबूत बनविण्यासाठी लेटरल रेजेज म्हणजेच साइड रेजेज बेस्ट एक्सरसाइज आहे. लेटरल रेजेज आइसोलेशन मूवमेंट आहे, ज्याला आपण डंबल्सच्या साह्यानेही करु शकता, किंवा आपण पुली मशीनमध्ये केबलचा वापर करुनही करु शकता. विशेषत: लेटरल रेजेज दरम्यान खांद्यांना निरंतर एका तणावाची गरज भासते आणि पुली मशीनद्वारा या प्रकारचा तणाव सहज उपलब्ध होतो. एवढेच नव्हे तर याने आपले मसल्सदेखील दोन्ही बाजूंनी म्हणजेच एसेंट्रिक आणि कंसेंट्रिक फेजशी प्रभावित होतात. Also Read : Fitness : बॉडी बिल्डिंगचे हे आहेत ‘५’ मोठे गैरसमज, सर्वांना वाटतात सत्य ! : Fitness : ‘सिक्स पॅक्स’ अॅब्स बनविण्यासाठी हे आहेत सोपे एक्झरसाइज !