Fitness : सेलेब्ससारखे फिट राहायचे असेल तर या ९ गोष्टींची सवय अवश्य लावा !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 5:38 AM
आपणासही सेलेब्ससारखे फिट राहायचे असेल तर आम्ही आपणास काही सवयींबाबत माहिती देत आहोत ज्या आपणास फिट राहण्यास मदत करतील.
फिटनेस आणि सेलिब्रिटी हे जणू समिकरणच आहे. प्रत्येक सेलिब्रिटींना अभिनय क्षेत्रात टिकायचे असेल तर त्यांना फिट असणे आवश्यक आहे. म्हणूनच ते आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढुन जिम, योगा आणि योग्य डायटचा आपल्या लाइफमध्ये समाविष्ट करतात. विशेषत: त्यांच्या या सवयी ते कटाक्षाने फॉलो करतातच. आपणासही सेलेब्ससारखे फिट राहायचे असेल तर आम्ही आपणास काही सवयींबाबत माहिती देत आहोत ज्या आपणास फिट राहण्यास मदत करतील. * योग्य डायट फिट राहण्यासाठी योग्य डायट आवश्यक असतो. त्यानुसार आपल्या आहारात प्रोटीन, विटॅमिन्सचे प्रमाण भरपूर असावे. साखरेचे प्रमाण कमी असावे. फिट राहण्यासाठी दिवसातून कमीतकमी चार वेळा आहार घ्यावा. * भरपूर पाणी प्या आपल्या सकाळची सुरुवात रोज एक ग्लास पाण्याने व्हायला हवी. आणि दिवसभरात ६ ते ८ ग्लास पाणी अवश्य प्यावे. यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. * व्यायाम करणे आपण कितीही व्यस्त असाल आणि व्यायाम करायला वेळ नसेल, मात्र आपणास फिट राहण्यासाठी रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. * नाश्ता कधीही टाळू नका बऱ्याचदा आपण घाईत नाश्ता करणे टाळतो, मात्र असे करणे चुकीचे आहे. नाश्ता केल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते शिवाय शरीर दिवसभर ऊर्जावान असते. * पायी चालणे सध्या बरेच लोक पायऱ्यांचा वापर किंवा पायी चालणे टाळतात. यामुळे आपली शारीरिक क्षमता कमकुवत होते. जर आपण रोज पायी फिरलो किंवा पायºयांचा वापर केला तर आपले शरीर फिट होण्यास मदत होते. * शरीरास ताण देणे एक्सरसाइजनंतर आपल्या शरीरास नेहमी ताण द्यावा. यामुळे आपण फिट राहू शकाल. शरीराला ताण दिल्याने सकाळी होणारी कमजोरीदेखील दूर होते. * सरळ बसून काम करावे मांसपेशींना वाकुन बसल्याने त्यादेखील कमकुवत होतात. प्रत्येक काम सरळ बसून केल्याने मांसपेशींबरोबरच पाठीचा कणाही मजबूत होतो. * तणावमुक्त राहणे तणावात राहिल्याने भुक कमी लागते आणि लठ्ठपणा वाढू शकतो. यासाठी आपले मन प्रसन्न आणि तणावमुक्त असेल तर आपले आरोग्य सुदृढ राहून शरीर फिट राहू शकते. * पुरेशी झोप घेणेपुरेशी झोप घेतल्याने आपले शरीर फिट तर राहतेच शिवाय ऊर्जावानदेखील राहते.