FITNESS : ...म्हणून पुरुषांना जिम जाणे आवडते !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2017 11:20 AM
फिटनेस व्यतिरिक्तही जिममध्ये जाण्याचे हे आहेत अन्य फायदे, जाणून घ्या !
-रवींद्र मोरे आपले शरीर फिट राहावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी बरेचजण जिमला जाणे पसंत करतात. विशेषत: आपले फिटनेस टिकविण्यासाठी प्रत्येक सेलिब्रिटीदेखील जिमचाच आधार घेतात. जिममध्ये मेहनत घेतल्यानंतर त्यांना हवा तसा लूक मिळतो. जिममध्ये व्यायाम करण्याचे या व्यतिरिक्तही फायदे असल्याचे एका नव्या संशोधनातून समारे आले आहेत. जिममध्ये वर्षभर नियमित स्वरूपात केलेल्या व्यायामाने हाडांमध्ये तयार होणारे स्क्लेरोस्टीन नामक प्रोटीनचे प्रमाण कमी होते शिवाय आयजीएफ-१ या हाडांच्या वाढीसाठी आवश्यक हार्मोनचे प्रमाण वाढवण्यासही मदत होते असे संशोधनात म्हटले आहे. बोन जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, या बदलांमुळे हाडांची निर्मिती होऊन हाडांची घनता वाढते. याव्यतिरिक्त जिममध्ये व्यायाम केल्याने हृदयरोग, मधुमेह किंवा लठ्ठपणा कमी होतो असे कोलंबियाच्या मिसोरी विद्यापीठातील प्राध्यापक पामेला हिंटन यांनी सांगितले आहे. करण्यात आलेल्या संशोधनात २५ ते ६० वर्ष वयोगटातील पुरुषांचे दोन गट करण्यात आले होते. सुमारे १२ महिने एका गटाने रेजिस्टन्स ट्रेनिंग व्यायाम केला आणि दुसऱ्या गटाने एक पायाची, दोन पायाची अशा प्रकारच्या उड्या मारण्याचा व्यायाम केला. १२ महिन्यांनी दोन्ही गटांचे परीक्षण केले असता, दोन्ही गटांमध्ये प्रोटीन हॉर्मोनच्या प्रमाणात वाढ व स्क्लेरोस्टीन या हानिकारक प्रोटीनच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. असे हिंटन यांनी सांगितले. यासोबतच आयजीएफ-१ या हाडांच्या वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या हॉर्मोनच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे या संशोधनात आढळले आहे. या शिवाय जिममध्ये व्यायाम केल्याने टेस्टोस्टेरॉन लेव्हल, अॅनर्जी लेव्हल आणि आत्मविश्वास वाढतो तसेच टोन्ड-अट्रॅक्टिव्ह बॉडी मिळते, तणाव दूर होतो आणि ब्रीदिंगवर कंट्रोलही निर्माण होतो. Also Read : ...म्हणून नाश्ता करण्यापुर्वी व्यायाम करावा ! : Health : ...म्हणून विना मेडिकल चेकअप जॉईन करू नये जिम !