हेल्दी राहण्यासाठी योग्य डाएट घेण्याचा अनेकदा सल्लाही देण्यात येतो. त्याचबरोबर मीठ, कमी साखर आणि कमी तेलाचे पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु काही लोकांना सतत गोड पदार्थ खात रहावं असं वाटत असतं. अनेकदा तर ही लोक इच्छा नसतानाही भरपूर गोड पदार्थ खातात. अशी लोकं शुगर क्रेविंगची शिकार असतात. तुम्हालाही शुगर क्रेविंग होत असेल तर या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमची सुटका करून घेऊ शकता.
जेव्हा तुम्ही फार तणावात असता त्यावेळी तुम्हाला सर्वात जास्त जंक फूड आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असते.
साखर कमी खाण्यासोबतच तुम्ही या गोष्टीवरही लक्ष देणं गरजेचं असतं की तुम्ही कोणतं पेय पित आहात. अनेकदा तुम्ही हेल्दी समजून एखाद फ्रुट ज्यूस किंवा कोल्ड ड्रिंक घेता. परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर आणि शक्रोज असतं. त्यासाठी पॅकेटबंद फ्रुट ज्यूस, स्पोर्ट ड्रिंक, एनर्जी ड्रिंक किंवा सोडा असलेल्या पेयांऐवजी नारळाचं पाणी आणि घरच्या घरी तयार करण्यात आलेली पेयं घ्या. मोठ्या प्रमाणात हेल्दी फॅट्सचा आहारामध्ये समावेश करावा. हेल्दी फॅट्स शरीरातील सूज कमी करण्यासोबतच तुमचं पोट भरण्याचंही काम करतात. याप्रकारे तुम्हाला जंक फूड किंवा साखर खाण्याची इच्छा कमी होईल. हेल्दी फॅट्स म्हणून ऑलिव्ह ऑइल, पीनट बटर, सीकॉड ऑइल आणि फ्लैक्सीडसारख्या पदार्थांचा समावेश करावा.
जास्त वेळ उपाशी राहू नका. स्नॅक्स खात असाल तर त्यामध्ये हेल्दी स्नॅक्सचा समावेश करा. त्यामुळे तुमचं मेटाबॉलिज्म नीट राखण्यास मदत करतं. तुम्ही ग्रीन टी, फळं, ब्लॅक कॉफी, मल्टीग्रेन, बिस्किट, दही यांसारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.
तुम्हाला वर्कआउट करणंही फायदेशीर ठरतं. त्यामुळे तुम्ही भावनात्मक तणावापासून दूर राहता. त्याचप्रमाणे यामुळे तुमचे फॅट्स कमी होऊन शरीरातील साखरंचं प्रमाणंही नियंत्रित राहते.