Walking or Running which one is Best: शरीर फीट ठेवण्यासाठी सगळ्यात जास्त गरजेची असते एक्सरसाइज, चांगली लाइफस्टाईल, हेल्दी डाएट यामुळे शरीर निरोगी राहतं. शारीरिक दृष्टीने फीट राहण्यासाठी एक्सरसाइज फार महत्वाची असते. सगळ्यात सोपी एक्सरसाइज आहे चालणं किंवा धावणं. बऱ्याच लोकांना रोज चालण्याची सवय असते तर काही लोक धावायला जातात. पण या दोन्हींपैकी सगळ्यात फायदेशीर काय हे माहीत आहे का? चला जाणून घेऊ.
हेल्थवर अवलंबून
चालण किंवा फिरणं दोन्हीही तुमच्या हेल्थवर अवलंबून असतं. तशा या दोन्ही ॲक्टिविटी फार चांगल्या असतात. वॉकिंग आणि रनिंगमधून एक निवडण्यासाठी तुम्हाला तुमची हेल्थ बघावी लागेल.
रिसर्च काय सांगतो ?
मेडिसिन आणि सायन्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित एक सर्व्हे साधारण 6 वर्षे करण्यात आला. ज्यात रनिंग करणाऱ्या 30 हजार लोकांसोबत आणि वॉकिंग करणाऱ्या 15 हजार लोकांसोबत चर्चा करून डेटा एकत्र करण्यात आला. यातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, या दोनपैकी कोणत्याही गटाने जास्तीत जास्त वजन कमी केलं आणि कुणी वजन कायम ठेवलं.
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, वॉकिंग आणि रनिंग दोन्ही गटाने दर आठवड्यात बरोबरीत कॅलरी बर्न केल्यात. पण रनिंग करणाऱ्या गटामध्ये असेही लोक होते, जे त्यांचं वजन कंट्रोल करण्यात आणि जास्त काळासाठी कामय ठेवण्यात यशस्वी ठरले.
वर्कआउटनंतरही कॅलरी बर्न होतात
असं यासाठी कारण high intensity एक्सरसाइजचे परिणाम नॉर्मल वर्कआउटच्या तुलनेत जास्त आणि दीर्घ काळासाठी बघायला मिळतात. high intensity एक्सरसाइज किंवा वर्कआउटच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही आरामाच्या मुद्रेत असता त्यावेळी सुद्धा कॅलरी बर्न होत राहतात. कारण फार जास्त तीव्रता असलेल्या एक्सरसाइज दरम्यान तुमचा मेटाबॉलिज्म रेट वाढतो आणि एक्सरसाइज करण्याच्या 14 तासांनंतरही शरीरातील कॅलरी बर्न होत राहतात.
जे जमेल ते करा
यातून हे स्पष्ट झालं आहे की, वजन कमी करण्यासाठी वॉकिंगपेक्षा रनिंग अधिक फायदेशीर असते. पण तरी सुद्धा जर तुम्हाला वॉकिंग जास्त पसंत असेल तर तुम्ही वॉकिंग करायला हवं. कारण अनेक रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, व्यक्तीला जी गोष्ट पसंत असते ती तो नियमित करू शकतो. त्यामुळे जे आवडतं ते करावं.